अनास्था: लाखोंचा महसूल देणाऱ्या व्यापारी गाड्यांची दुरवस्था, स्वतंत्र पार्किंग अभावी वाहतुकीची होतेय कोंडी.
उपसंपादक सौ
: जयश्री गुंजाळ
पालिकेने आपल्याला उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी व्यापारी संकुलांची उभारणी केली आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी या व्यापारी संकुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असुविधाचा सामना व्यापारांना करावा लागत आहे. पालिकेस लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या या व्यापारी संकुलांमध्ये सुविधा पुरवण्यास पालिका अपयशी ठरली आहे. शहरातील विविध व्यापारी संकुलात शौचालय व इतर सुविधा नसल्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गात तीर्व नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात गणेश व्यापारी संकुल, अष्टभुजा कॉम्प्लेक्स , मोमाया कॉम्प्लेक्स, बजाज कॉम्प्लेक्स, नगरपालिका संकुल ,गायत्री प्लाझा, नगरपालिका दवाखाना संकुल सुवर्णाताई देशमुख संकुल
असे अनेक व्यापारी संकुल आहेत. शहरातील व्यापारी संकुलातील एक हजारांवर गाळेधारक नियमित नगरपालिकेचा कर भरणा करीत असूनही व्यापारी संकुलातील स्वच्छतागृहांची दूरवस्था , घाणीचे साम्राज्य, मोडकळीस आलेली जिने व कठडे तसेच अस्ताव्यस्त पार्किंगची समस्या कायम आहे.
रिकाम्या गाळ्यामध्ये दारुड्यांचा उपद्रव्य तसेच या ठिकाणी असलेल्या रिकाम्या व्यापारी गाळ्यांमध्ये ही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही व्यसनाधीन लोकांचा या ठिकाणी वावर असतो.तसेच सर्व संकुलातील जिन्यांच्या पायऱ्या व कठडे तुटले असून तेही दुरुस्त व्हावेत अशीही मागणी परिसरातील व्यावसायिकांनी केली आहे.
लवकरच केली जाणार स्वच्छता शहरातील सर्व व्यापारी संकुलांची पाहणी करण्यात येणार आहे.येथील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेत, स्वच्छता लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल व ड्रेनेजची समस्या मार्गी लावण्यात एईल. सैरभ जोशी, मुख्याधिकारी,न,पा. चाळीसगाव .
संकुलातील स्वच्छतागृहांची दुरवस्था सारखीच आहे.तरी नगरपालिकेनी लक्ष देऊन स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी व जमा होणारे पाणी स्वच्छ करावे अशी मागणी केली जात आहे.ज्या वेळी हे व्यापारी संकुलन पूर्ण करण्यात आले त्यावेळी नगरपालिकेकडून ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली नव्हती का असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे.
Comments
Post a Comment