कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
वाघ परिवाराचे सर्वत्र कौतुक
चाळीसगाव (प्रतिनिधी) :समाजात दयाभाव व सेवा वृत्ती जोपासणारे दिवंगत कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चाळीसगाव येथील अंधशाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोआहाराचे आयोजन करण्यात आले. वाघ परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी श्रद्धांजली अर्पण करून उपक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर वाघ परिवारातील सदस्यांनी विद्यार्थ्यांना स्वतः अल्पोआहार वाटप केला. विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक गरजा व अडचणी जाणून घेण्यात आल्या.
या वेळी वाघ परिवाराने सांगितले की, “कै. रमेश विक्रम वाघ यांनी नेहमीच समाजातील वंचित घटकांना मदत करण्याची शिकवण दिली. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही हा सेवा उपक्रम राबवला असून, भविष्यातदेखील समाजोपयोगी कार्य सुरूच राहील.”
कै. रमेश विक्रम वाघ यांचा जीवनप्रवास
कै. रमेश विक्रम वाघ हे लहानपणापासून आंधळे होते.त्यांची सावत्र आई ग.भा.पर्वताबाई विक्रम वाघ व त्यांचे दोन मुले ज्ञानेश्वर व जगदीश यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आधार म्हणजे दुसऱ्या आईची व भावाची अपार आपुलकी आणि तिच्या मुलांची जिव्हाळ्याची साथ. त्यांनी रमेशजींना आपल्या घरचा एक घटक मानून आयुष्यभर सेवा, जपणूक आणि आधार दिला. या प्रेमळ वातावरणामुळे रमेशजींनी आयुष्य नेहमी सकारात्मकतेने जगले. समाजाशी घट्ट नाळ जोडत इतरांसाठी प्रेरणादायी ठरले.
*समाजातील प्रतिसाद*
या उपक्रमामुळे पुण्यस्मरण दिन अर्थपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिक, सामाजिक संस्थांनी आणि मान्यवरांनी वाघ परिवाराच्या या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
अंधशाळेचे शिक्षक व व्यवस्थापनानेदेखील वाघ परिवाराचे आभार मानत या उपक्रमाचे स्वागत केले.
हा उपक्रम आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी चाळीसगाव येथे पार पडला.







Comments
Post a Comment