छ. संभाजी महाराज जयंती चे आयोजनअखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक संपन्न*


चाळीसगाव -


छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ ची बैठक जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक१४ मे रोजी ची छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती निमित्ताने मीटिंग आयोजित दिनांक ५ मे रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते असे ठरले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती संभाजी महाराज यांची वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्याचे ठरले आहे. पालखीचे नियोजन हे चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथे करण्याचे ठरले आहे. तरी सर्व छत्रपती संभाजीराजे भक्तांनी पालखी सोहळ्याला उपस्थित राहावे असे आव्हान अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. या बैठकीला जिल्हा *संपर्कप्रमुख खुशाल बिडे ,महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील स्वर उपाध्यक्ष कैलास पाटील, युवक तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील तालुका युवक उपाध्यक्ष कृष्णकांत  पाटील, तालुका युवक सचिव दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंजाळ ,सोमनाथ मोहिते बापू अहिरे* आदी समाज बांधव उपस्थित होते.

Comments