अंबरनाथमध्ये तरुणाची निर्घृण हत्या


प्रतिनिधी:-राजु गुंजाळ - नव दृष्टी न्यूज (अंबरनाथ)


(अंबरनाथ):-शहराच्या वेशीवरी भागात टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नालिंबी येथील तीन झाडी डोंगर परिसरात गुरुवारी सकाळी धडापासून शीर वेगळे केलेला एक तरुणाचा मृतदेह आढळून आला चार वर्षांपूर्वी याच भागात अशाच प्रकारचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळे खळबळ उडाली आहे अंबरनाथ पश्चिमेतील कोहोजगाव भागापासून डोंगरावर तीन झाडीचा निसर्गरम्य परिसर आहे अंबरनाथ आणि टिटवाळा भागाला जोडणाऱ्या नालिंबी भागात मोठ्या प्रमाणात लोक फिरण्यासाठी येत असतात गुरुवारी सकाळी येथे लोकांना एका तरुणाचे शिर धडा वेगळे केलेला मृतदेह निदर्शनास आला टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी दहावीतली तरुणाचे शिर पोलिसांकडून शोधण्यात येत असून त्यासाठी ड्रोन चा वापर केला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितले या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन झाडी नालिंबी भागात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची तसेच वाहनांची वर्दळ असते या भागात रात्री होणाऱ्या मध्यपाटर्यानी येथे गंभीर गुन्हेगारीच्या वाढत असल्याने या भागात हायमास्क दिवे बसवावेत तसेच अंबरनाथ.टिटवाळा पोलिसांनी रात्री संयुक्त गस्त घालावी अशी मागणी होत आहे 

Comments