दुचाकिवरून २० लाखांचा गांजा वाहून नेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या



संपादक :- सचिन गुंजाळ :-

नवदृष्टी लाईव्ह न्यूज l २८ मे २०२५ l जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचाळे रोडवर चोपडा पोलिसांनी दुचाकीवरून तब्बल 20 लाख रुपयांचा गांजा वाहून  नेणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. कालूसिंग गोराशा बरेला (वय २६, रा.महादेव,ता. शिरपूर, जि. धुळे ) अस अटक केलेल्या या तरुणाच नाव आहे.


याबाबत असे की,चोपडा तालुक्यातून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांना मिळाली. त्यानुसार चिंचाळे रोडवर पोलीस पथकाने सापळा रचला. या सापळ्यात एका संशयित मोटार सायकलस्वाराला अडवून तपासणी केली असता त्याच्याकडे १० किलो ६००ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित गांजा आढळून आला. पोलिसांनी काळूसिंग गोराशा बरेला याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गांजा, मोटार सायकल आणि रोख रक्कम असा एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, हवालदार संतोष पारधी, लक्ष्मण शिंगाणे, रितेश चौधरी, ज्ञानेश्वर जगावे, संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ, महेंद्र पाटील या पथकाने ही कारवाई पार पाडली

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी