मुख्य संपादक:-सचिन गुंजाळ
चाळीसगाव तालुक्यातील घाट रोडवरील जिगरवाडी परिसरात गटाराची सफाई आणि कचऱ्याचे संकलन नीट न झाल्याने नागरिकांमध्ये त्रिव नाराजी पसरली आहे गटारातील सांडपाणी रस्त्यावर साचत असून कचरा वेळेवर न उचलल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डास मच्छरांचा साम्राज्य वाढले आहे यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी खोकला अशा आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार करूनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही प्रशासनाकडून केवळ विजय जाधव या कंत्राटदाराला भेटा आणि बोला असे उत्तर दिले जात आहे मात्र संबंधित कंत्राटदार विजय जाधव यांना फोन केल्यास ते कॉल उचलत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संताप निर्माण झाला आहे आम्ही दरवेळी आश्वासनावर समाधान मानायचं का समस्या त्वरित न सोडवल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे
Comments
Post a Comment