संपादक:-सचिन गुंजाळ -नवदृष्टी न्यूज
जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक
विकास मामा च्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा निर्णय मंगळवारी अमेरिका मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्ष वरून खाली पार पडलेल्या या बैठकीत जळगाव औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांना एक,बी,सी डी दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं डी झोन मध्ये समाविष्ट झाला असून स्थानिक उद्योजकांसाठी हा निर्णय क्रांतिकारक ठरणार आहे
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला निर्णय
पालकमेथी गुलाबराव पाटील जलसंपदामंत्री गिरीश महाजन केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे खासदार स्मिताताई वाघ आमदार अनिल पाटील आमदार सुरेश भोळे आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार किशोर पवार पाटील आमदार मंगेश चव्हाण आमदार अमोल पाटील आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुरामुळे अखेर जळगाव अमळनेर चाळीसगाव धरणगाव आणि यावल या पाच तालुक्यांनाही डी दर्जा मिळाला याआधी जिल्ह्यातील दहा तालुके आधीच डी झोन मध्ये होते आता संपूर्ण जिल्ह्याचं सवलतीच्या झोनमध्ये आला आहे
उद्योग मंत्री उदय सामान म्हणाले डी #दर्जा मिळाल्यामुळे उद्योगांना हक्काच्या सवलती मिळतील स्थानिक तरुणांसाठी रोजगार संधी वाढतील जिल्ह्याचा औद्योगिक पाया अधिक बळकट होईल या संदर्भातील शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले जळगाव जिल्हा अनेक वर्षापासून औद्योगिक सवलती पासून वंचित होता सातत्याने उद्योग विभागाकडे पाठपुरावा करून अखेर हा निर्णय मिळविला या निर्णयामुळे जिल्ह्याच्या समतोल औद्योगिक विकासाला चालना मिळेल स्थानिक अर्थचक्राला बळकटी रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधा वाढीसाठी हे पाऊल निर्णय ठरेल
डी # दर्जामुळे मिळणाऱ्या प्रमुख सवलती
1) नव्याने सुरू होणाऱ्या औद्योगिक दहा वर्षासाठी राज्य वस्तू सेवा करा मधून ( एस. जी .एम .टी )100 टक्के परतावा
2) विस्तार करणाऱ्या उद्योगांना ९ वर्षासाठी एस जी एस टी परतावा
3) मुदत कर्जावर पाच टक्के व्याज परतावा
4) वीजदर व वापरावर सवलत वीज शुल्क माफी
5) पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती
*उद्योजकांमध्ये उत्सवाचे वातावरण*
संपूर्ण जिल्हा डी झोनमध्ये आल्यामुळे उद्योगांना अपेक्षित सवलती मिळणार आहेत त्यामुळे नव्या उद्योगाची स्थापना व विस्तार शक्य होणार आहे अशी प्रतिक्रिया अनेक उद्योजकांनी दिली हा निर्णय जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीत मैलाचा दगड ठरणार असून मोठ्या मध्यम व उद्योजकांमध्ये चैतन्य निर्माण झाले
Comments
Post a Comment