संपादक:-सचिन गुंजाळ
चाळीसगाव:-एरंडोल येथे एकावर प्राण घातक हल्ला करून फरार झालेले दीपक पाटील रोहित पाटील हे दोन आरोपी नांदगाव कडून चाळीसगाव कडे खाजगी वाहनातून येत असल्याची माहिती चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी चाळीसगाव नांदगाव रोडवर असलेला हॉटेल नक्षत्र जवळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हे. कॉ. सचिन पाटील.कॉ. राहुल महाजन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हे.कॉ. राहुल सोनवणे.कॉ. ज्ञानेश्वर पटोले विजय महाजन यांना नाकाबंदी करण्याचा आदेश दिला वरिष्ठांच्या आदेशा वरून वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी हॉटेल नक्षत्र जवळ नाकाबंदी केली असता त्यांना ग्रे कलरची स्विफ्ट कार नांदगाव कडून चाळीसगाव कडे येत असताना दिसली सदरची कार त्यांनी थांबवली असता या कारमध्ये त्यांना वरील दोन्ही आरोपी मिळून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर एरंडोल पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले
Comments
Post a Comment