संपादक:-सचिन गुंजाळ
नवदृष्टी न्यूज :- 25 मे 2025:- चाळीसगाव तालुक्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिलाखेड गावाजवळ मोठा अपघात झाला आहे. वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उडान पुलावरून खाली कोसळला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.
चाळीसगाव मधील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिलाखेड गावानजीक असलेल्या उडान पुलावर चालकाचे ट्रॅक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उडान पुलावरून खाली कोसळला.
या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू करत दोन्ही गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
Comments
Post a Comment