जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरूणाला बेड्या



संपादक -सचिन गुंजाळ -


जळगाव एमआयडीसी पोलिसांनी पिस्टल च्या धाकावर दहशत निर्माण करणाऱ्या  तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणी शनिवारी ३ मे रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चेतन वसंता देऊळकर असे  आरोपीचे नाव आहे कुसुंबा शहरातील साई सिटी परिसरात चेतन वसंता देऊळकर नामक तरुण गावठी पिस्टल घेऊन फिरत असलेली गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी लगेच पथकला कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवार २ मे सायंकाळी सापळा रचून संशयित आरोपी त्याच्या जवळून वीस हजार रुपये किमती चा गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त करण्यात आला याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून चेतन वसंत देऊळकर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे

Comments