चाळीसगाव;- पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे धाडस दाखवत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं, त्यातून आपली सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.


संपादक:-सचिन गुंजाळ 

चाळीसगाव:-





यशाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सहभागी होणं ही केवळ एक जबाबदारी नव्हती, तर ही माझ्यासाठी गौरवाची आणि गर्वाची गोष्ट होती. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा व माजी सैनिकांचा सत्कार चाळीसगावकरांच्या वतीने करण्यात आला.


शहरातील असंख्य देशप्रेमी नागरिक, युवक-युवती, माता-भगिनी आणि लहानग्यांनी प्रचंड उत्साहाने या तिरंगा यात्रेत भाग घेतला. प्रत्येकाच्या डोळ्यांत देशासाठी अभिमान होता, ओठांवर ‘भारत माता की जय’चा जयघोष होता आणि हाती अभिमानाने फडकणारा तिरंगा होता!


भारतीय सेना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये. चला, एकजुटीने देशप्रेमाचे तेज जपूया, आणि भविष्यासाठी निर्धार बाळगूया — दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणाऱ्या भारताच्या बाजूने खंबीरपणे उभं राहूया!


जय हिंद! वंदे मातरम्!



Comments