पारोळा : टोल नाक्यावर दोन गटांमध्ये भीषण हाणामारी, 8 जण जखमी



संपादक:-सचिन गुंजाळ 

नवदृष्टी न्युज लाईव्ह :- l २७ मे २०२५ l पारोळा तालुक्यात असलेल्या सब गव्हाण टोल नाक्यावर दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली असून यामुळे खळबळ उडाली. या हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ जण जखमी झाले आहे. तर त्यापैकी पाच जण असून गंभीर असल्याची माहिती समोर आली. जखमींना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 


व्हिडिओ व्हायरल : 

दरम्यान या सर्व हाणामारीच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक दिवसांपूर्वी टोलनाक्यावर वाद झाला होता त्याच वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. व्हायरल व्हिडीओत दोन्ही गटातील सदस्य  एकमेकांवर दगडांनी आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहीजण रस्त्यावर पडून असताना त्यांच्यावरही बेधडक मारहाण सुरू होती. 


या हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नशिराबाद टोळीतील दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले .

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी