भाजप आमदाराचा पोलिसा कर्मचाऱ्यावर खंडणीचा आरोप: मंगेश चव्हाण यांचा चाळीसगाव पोलीस ठाण्यात ठिय्या, कारवाईची मागणी

संपादक :-सचिन गुंजाळ


जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव गाव आणि शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यातील नाव कमी करण्यासाठी तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे. तडजोडीनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपये विस लाख

स्वीकारल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. खंडणी घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करत आमदार चव्हाण यांनी थेट चाळीसगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

संबंधी तरुणाने या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी चाळीसगाव पोलीस ठाणे गाठले. यावेळी आमदारांनी तक्रारदार तरुणाशी पोलीस अधिकाऱ्यासमोरच संवाद साधला. त्यावेळी संबंधित तरुणाने पैशांची मागणी झाल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनीही याबाबत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता, त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून आटक करण्यात यावी,अशी आग्रही  मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.

दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस  ठाणे सोडणार नाही. असा अपवीत्रा आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतला आहे. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना आमदार चव्हाण म्हणाले, आत्ताच्या आत्ता हा आत्ता घ्या आता पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. त्याला अटक करा. पोलीस ठाण्याजवळ अनेक वैद्य व्यवसाय सुरू आहे. त्या संदर्भात कारवाई का होत नाही? असा प्रश्न आणि उत्तर आमदार चव्हाण यांनी विचारला. 

काही दिवसांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या अनुदान प्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आवाज उठवला झोपवला होता.  विहिरीच्या अनुदानासाठी पंचायत समितीचे कर्मचारी 20 ते 30 हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार आमदार चव्हाण यांच्याकडे आली होती. त्यानंतर  आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट पंचायत समिती गाठत, दोन दिवसात दोषीवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

Comments