राष्ट्रवादीला महिन्याभरात दुसरा धक्का: शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, पराग मोरे भाजपात दाखल भाजपात इनकमिंग सुरुज


संपादक :-सचिन गुंजाळ 

पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, त्यांचे बंधू 


संजय वाघ, दूध संघाचे परोळ्याचे संचालक पराग मोरे, एरंडोल येथील ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. जिल्ह्यातून जवळपास २१९ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळी, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदामत्री गिरीश महाजन, प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष विजय चौधरी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. 


पाचोरा l राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांचे बंधू संजय वाघ यांसह १७८ पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, भडगाव येथील भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल पाटील, पाचोरा येथील भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादीचे उपाजिल्हाध्यक्ष प्रा. भागवत मालपुरे, प्रकाश पाटील, अनिल पाटील, राजेंद्र पाटील, तालुका शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन सुनील पाटील, नगरसेवक वासुदेव महाजन यांसह १७८ जणांनी प्रवेश केला. कार्यकर्ते व सर्वसामान्यांचे कामे होण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले.

Comments