Posts

Showing posts from May, 2025

लोकमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजन*

Image
संपादक:-सचिन गुंजाळ  चाळीसगाव (वार्ताहार)लोकमाता अहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे  की,लोकमाता अहिल्यादेवी यांच्या 300 व्या.जयंतीनिमित्ताने 31मे 2025 रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजननाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे  यांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रतिमेचे पूजन केले.  लोकमाता अहिल्यादेवी यांचा जय जयकार केला. यावेळी चाळीसगाव शहर उप अध्यक्ष कैलास पाटील यांनी लोकमाता अहिल्यादेवी  यांच्या जीवनावर आपल्या मनोगतात प्रकाशझोत टाकला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे , चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील,तालुका संघटक शेखर पाटील सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंजाळ,,शहर संघटक किरण जाधव , सागर पाटील, ज्ञ...

अंबरनाथमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

प्रतिनिधी:-राजु गुंजाळ - नव दृष्टी न्यूज (अंबरनाथ) (अंबरनाथ):-शहराच्या वेशीवरी भागात टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नालिंबी येथील तीन झाडी डोंगर परिसरात गुरुवारी सकाळी धडापासून शीर वेगळे केलेला एक तरुणाचा मृतदेह आढळून आला चार वर्षांपूर्वी याच भागात अशाच प्रकारचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळे खळबळ उडाली आहे अंबरनाथ पश्चिमेतील कोहोजगाव भागापासून डोंगरावर तीन झाडीचा निसर्गरम्य परिसर आहे अंबरनाथ आणि टिटवाळा भागाला जोडणाऱ्या नालिंबी भागात मोठ्या प्रमाणात लोक फिरण्यासाठी येत असतात गुरुवारी सकाळी येथे लोकांना एका तरुणाचे शिर धडा वेगळे केलेला मृतदेह निदर्शनास आला टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी दहावीतली तरुणाचे शिर पोलिसांकडून शोधण्यात येत असून त्यासाठी ड्रोन चा वापर केला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितले या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन झाडी नालिंबी भागात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची तसेच वाहनांची वर्दळ असते या भागात रात्री होणाऱ्या मध्यपाटर्यानी येथे गंभीर गुन्हेगारीच्या वाढत असल्याने या भागात हायमास्क दिवे बसवावेत तसेच अंबरनाथ.टिटवाळा ...

दुचाकिवरून २० लाखांचा गांजा वाहून नेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संपादक :- सचिन गुंजाळ :- नवदृष्टी लाईव्ह न्यूज l २८ मे २०२५ l जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचाळे रोडवर चोपडा पोलिसांनी दुचाकीवरून तब्बल 20 लाख रुपयांचा गांजा वाहून  नेणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. कालूसिंग गोराशा बरेला (वय २६, रा.महादेव,ता. शिरपूर, जि. धुळे ) अस अटक केलेल्या या तरुणाच नाव आहे. याबाबत असे की,चोपडा तालुक्यातून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांना मिळाली. त्यानुसार चिंचाळे रोडवर पोलीस पथकाने सापळा रचला. या सापळ्यात एका संशयित मोटार सायकलस्वाराला अडवून तपासणी केली असता त्याच्याकडे १० किलो ६००ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित गांजा आढळून आला. पोलिसांनी काळूसिंग गोराशा बरेला याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गांजा, मोटार सायकल आणि रोख रक्कम असा एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, हवालदार संतोष पारधी, लक्ष्मण शिंगाणे, रितेश चौधरी, ज्ञानेश्वर जगावे, संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ, महेंद्र पाटील या पथकाने ही कारवाई...

मोठी बातमी जळगाव एम .आय .डी .सी .ला डी # दर्जा ऐतिहासिक निर्णय

Image
संपादक:-सचिन गुंजाळ -नवदृष्टी न्यूज जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक  विकास मामा च्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा निर्णय मंगळवारी अमेरिका मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्ष वरून खाली पार पडलेल्या या बैठकीत जळगाव औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांना एक,बी,सी डी दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं डी झोन मध्ये समाविष्ट झाला असून स्थानिक उद्योजकांसाठी हा निर्णय क्रांतिकारक ठरणार आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला निर्णय पालकमेथी गुलाबराव पाटील जलसंपदामंत्री गिरीश महाजन केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे खासदार स्मिताताई वाघ आमदार अनिल पाटील आमदार सुरेश भोळे आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार किशोर पवार पाटील आमदार मंगेश चव्हाण आमदार अमोल पाटील आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुरामुळे अखेर जळगाव अमळनेर चाळीसगाव धरणगाव आणि यावल या पाच तालुक्यांनाही डी दर्जा मिळाला याआ...

राष्ट्रवादीला महिन्याभरात दुसरा धक्का: शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, पराग मोरे भाजपात दाखल भाजपात इनकमिंग सुरुज

Image
संपादक :-सचिन गुंजाळ  पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, त्यांचे बंधू  संजय वाघ, दूध संघाचे परोळ्याचे संचालक पराग मोरे, एरंडोल येथील ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. जिल्ह्यातून जवळपास २१९ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळी, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदामत्री गिरीश महाजन, प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष विजय चौधरी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.  पाचोरा l राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांचे बंधू संजय वाघ यांसह १७८ पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, भडगाव येथील भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल पाटील, पाचोरा येथील भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादीचे उपाजिल्हाध्यक्ष प्रा. भागवत मालपुरे, प्रकाश पाटील, अनिल पाटील, राजेंद्र पाटील, तालुका शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन सुनील पाटील,...

25 वर्षीय तरुणीची 22 व्या मजल्यावरून उडी : खाली पडताच शरीराचे झाले 2 तुकडे, घटनास्थळी रक्तामांसाचा सडा; मुंबईतील भयंकर घटना

Image
संपादक:-सचिन गुंजाळ  एका 25 वर्षीय तरुणीची 22 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची भयंकर घटना मुंबईच्या विक्रोळी परिसरात घडली आहे. भयंकर म्हणजे सदर मुलगी इमारतीच्या परिसरात पार्क करण्यात आलेल्या एका दुचाकीवर पडली. यामुळे तिच्या शरीराचे 2 तुकडे होऊन घटनास्थळी अक्षरश: रक्तामांसाचा सडा पडला होता. यासंबंधीच्या माहितीनुसार, विक्रोळीतील कन्नमवार नगरात सोमवारी  रात्री उशिरा ही घटना घडली. हर्षदा तांदोलकर असे मृत तरुणीचे नाव आहे. मुंबईत सोमवारी मुसळधार पाऊस सुरू असताना तिने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली . तिने हे टोकाचे पाऊल का उचलले ? हे स्पष्ट झाले नाही.  पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. प्रत्यक्षर्शींनी काय सांगितले? प्रत्यक्षर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय हर्षदा तांदोलकरने इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर घटनास्थळावरील दृश्य अंगाचा थरकाप उडवणारे होते. कन्नमवार नगरातील इमारत क्रमांक 97 मध्ये ही घटना घडली. एवढ्या उंचीवरून उडी मारल्यामुळे तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. यामुळे घटनास्थळी रक्तामांसाचा सडा पडला...

एरंडोल हल्ला प्रकरणातील दोघा आरोपींना चाळीसगाव पोलिसांकडून अटक करून एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन केले

Image
संपादक:-सचिन गुंजाळ  चाळीसगाव:-एरंडोल येथे एकावर प्राण घातक हल्ला करून फरार झालेले दीपक पाटील रोहित पाटील हे दोन आरोपी नांदगाव कडून चाळीसगाव कडे खाजगी वाहनातून येत असल्याची माहिती चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी चाळीसगाव नांदगाव रोडवर असलेला हॉटेल नक्षत्र जवळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हे. कॉ. सचिन पाटील.कॉ. राहुल महाजन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हे.कॉ. राहुल सोनवणे.कॉ. ज्ञानेश्वर पटोले विजय महाजन यांना नाकाबंदी करण्याचा आदेश दिला वरिष्ठांच्या आदेशा वरून वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी हॉटेल नक्षत्र जवळ नाकाबंदी केली असता त्यांना ग्रे कलरची स्विफ्ट कार नांदगाव कडून चाळीसगाव कडे येत असताना दिसली सदरची कार त्यांनी थांबवली असता या कारमध्ये त्यांना वरील दोन्ही आरोपी मिळून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर एरंडोल पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले

पारोळा : टोल नाक्यावर दोन गटांमध्ये भीषण हाणामारी, 8 जण जखमी

Image
संपादक:-सचिन गुंजाळ  नवदृष्टी न्युज लाईव्ह :- l २७ मे २०२५ l पारोळा तालुक्यात असलेल्या सब गव्हाण टोल नाक्यावर दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली असून यामुळे खळबळ उडाली. या हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ जण जखमी झाले आहे. तर त्यापैकी पाच जण असून गंभीर असल्याची माहिती समोर आली. जखमींना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  व्हिडिओ व्हायरल :  दरम्यान या सर्व हाणामारीच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक दिवसांपूर्वी टोलनाक्यावर वाद झाला होता त्याच वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. व्हायरल व्हिडीओत दोन्ही गटातील सदस्य  एकमेकांवर दगडांनी आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहीजण रस्त्यावर पडून असताना त्यांच्यावरही बेधडक मारहाण सुरू होती.  या हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नशिराबाद टोळीतील दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले .

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उडानपुलावरून खाली; दोघे गंभीर जखमी

Image
संपादक:-सचिन गुंजाळ  नवदृष्टी न्यूज :- 25 मे 2025:- चाळीसगाव तालुक्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिलाखेड गावाजवळ मोठा अपघात झाला आहे. वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उडान पुलावरून खाली कोसळला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.  चाळीसगाव मधील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिलाखेड गावानजीक असलेल्या उडान पुलावर  चालकाचे ट्रॅक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उडान पुलावरून खाली कोसळला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू करत दोन्ही गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

मुलाने केली हत्या अन् आईची आत्महत्या: सांगलीच्या कवठेमहाकाळ येथील घटना: मुलाने पैशांच्या वादातून केला होता तरुणांचा खून

Image
  उपसंपादक: जयश्री गुंजाळ: कवठे महाकाळ तालुक्यातील कुकटोळी येथील अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. आरोपींनी दिलेल्या पैशांची मागणी करत असलेल्या रागामुळे ही हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी 8 तासात खून करणाऱ्या सुशांत शेजुळ आणि स्वप्निल क्षीरसागर यांना अटक केली आहे.  दरम्यान, आरोपी मुलगा सुशांत शेजुळ यांनी केलेला खूनाचा धक्का सहन न झाल्याने आरोपीची आई विमल शंकर शेजुळ यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. साहित्य आणतो म्हणत पडले होते बाहेर  18 मे 2025 रोजी अजित क्षीरसागर हे घरातून दुकानात साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले होते. परंतु ते रात्री उशिरापर्यंत परतले नाहीत. त्यानंतर त्यांचे घरातील सदस्यांनी शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीत. 20 मे रोजी दुपारी गावात अजित  क्षीरसागर जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती मिळाली. ते मारुती कारंडे हायस्कूलच्या मागे पडले होते.  नेमके काय घडले?  कुकटोळे गावामध्ये रविवारी रात्री साडे दहा वाजाण्याच्या सुमारास आरोपी व क्षीरसागर बसले होते. सुशांत शेजुळ यास दिलेले 2 हजार रुप...

भाजप आमदाराचा पोलिसा कर्मचाऱ्यावर खंडणीचा आरोप: मंगेश चव्हाण यांचा चाळीसगाव पोलीस ठाण्यात ठिय्या, कारवाईची मागणी

Image
संपादक :-सचिन गुंजाळ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव गाव आणि शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यातील नाव कमी करण्यासाठी तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे. तडजोडीनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपये विस लाख स्वीकारल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. खंडणी घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करत आमदार चव्हाण यांनी थेट चाळीसगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. संबंधी तरुणाने या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी चाळीसगाव पोलीस ठाणे गाठले. यावेळी आमदारांनी तक्रारदार तरुणाशी पोलीस अधिकाऱ्यासमोरच संवाद साधला. त्यावेळी संबंधित तरुणाने पैशांची मागणी झाल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनीही याबाबत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता, त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून आटक करण्यात यावी,अशी आग्रही  मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे. दोषी ...

अनास्था: लाखोंचा महसूल देणाऱ्या व्यापारी गाड्यांची दुरवस्था, स्वतंत्र पार्किंग अभावी वाहतुकीची होतेय कोंडी.

Image
 उपसंपादक सौ : जयश्री गुंजाळ    पालिकेने आपल्याला उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी व्यापारी संकुलांची उभारणी केली आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी या व्यापारी संकुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर  असुविधाचा सामना व्यापारांना करावा लागत आहे. पालिकेस लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या या व्यापारी  संकुलांमध्ये सुविधा पुरवण्यास पालिका अपयशी ठरली आहे. शहरातील विविध व्यापारी संकुलात शौचालय व इतर सुविधा नसल्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गात तीर्व नाराजी व्यक्त होत आहे. शहरात गणेश व्यापारी संकुल, अष्टभुजा कॉम्प्लेक्स , मोमाया कॉम्प्लेक्स, बजाज कॉम्प्लेक्स, नगरपालिका संकुल ,गायत्री प्लाझा, नगरपालिका दवाखाना संकुल सुवर्णाताई देशमुख संकुल   असे अनेक व्यापारी संकुल आहेत. शहरातील व्यापारी संकुलातील एक हजारांवर गाळेधारक नियमित नगरपालिकेचा कर भरणा करीत असूनही व्यापारी संकुलातील स्वच्छतागृहांची दूरवस्था , घाणीचे साम्राज्य, मोडकळीस आलेली जिने व कठडे तसेच अस्ताव्यस्त पार्किंगची समस्या कायम आहे.   रिकाम्या गाळ्यामध्ये दारुड्यांचा उपद्रव्य तसेच या ठिकाणी असलेल्...

चाळीसगाव;- पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे धाडस दाखवत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं, त्यातून आपली सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.

Image
संपादक:-सचिन गुंजाळ  चाळीसगाव:- यशाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सहभागी होणं ही केवळ एक जबाबदारी नव्हती, तर ही माझ्यासाठी गौरवाची आणि गर्वाची गोष्ट होती. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा व माजी सैनिकांचा सत्कार चाळीसगावकरांच्या वतीने करण्यात आला. शहरातील असंख्य देशप्रेमी नागरिक, युवक-युवती, माता-भगिनी आणि लहानग्यांनी प्रचंड उत्साहाने या तिरंगा यात्रेत भाग घेतला. प्रत्येकाच्या डोळ्यांत देशासाठी अभिमान होता, ओठांवर ‘भारत माता की जय’चा जयघोष होता आणि हाती अभिमानाने फडकणारा तिरंगा होता! भारतीय सेना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये. चला, एकजुटीने देशप्रेमाचे तेज जपूया, आणि भविष्यासाठी निर्धार बाळगूया — दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणाऱ्या भारताच्या बाजूने खंबीरपणे उभं राहूया! जय हिंद! वंदे मातरम्!

दुर्दैवी घटना : मेहंदीच्या दिवशीच तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या!

  अंमळनेर शहरात सानेनगरातील घटना संपादक:-सचिन गुंजाळ  अमळनेर -शहरातील भागातील दीपाली सुभाष पाटील या तरूणीने १५ रोजी गुरुवारी पहाटे ३:४० वाजता स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली याप्रकरणी अंमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दीपाली पाटील हि आई.वडील यांच्या सह राहत होती.तिचा गडखांब येथिल तरूणाशी दि.१७ रोजी विवाह होणार होता.दि.१५ रोजी तिच्या घरी मेंहदीचा कार्यक्रम आयोजित केले होता १४ रोजी रात्री तिच्या घराबाहेर गीतांचा कार्यक्रम झाला मात्र भल्या पहाटे तिच्या आईला ती मृत अवस्थेत दिसून आली तिने मला पण घेऊन तिचे आयुष्य संपवले होते घटनेमुळे अंमळनेर शहरात शोककळा पसरली आहे तिने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजन*

Image
संपादक:-सचिन गुंजाळ  चाळीसगाव  (वार्ताहार)  स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे  की,छत्रपती संभाजी महाराज368 व्या.जयंतीनिमित्ताने 14मे 2025 रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजननाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे  यांच्या हस्ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रतिमेचे पूजन केले.  स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार केला. यावेळी चाळीसगाव  सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंजाळ यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आपल्या मनोगतात प्रकाशझोत टाकला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे ,जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील,  तालुका उपाध्यक...

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चाळीसगाव तालुक्यातील कार्यकारिणीत खालील पदांवर नियुक्ती करण्यात आली

Image
दिनांक :13/ 05 |2025 संपादक:-सचिन गुंजाळ-   वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब(उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्रा्य) यांच्या आदेशानुसार, शिवसेना पक्षाची चाळीसगाव तालुक्यातील कार्यकारिणीत खालील पदांवर नियुक्ती करण्यात येत आहेत असे पक्षाकडून अधिकृतरीत्या या व प्रसिद्धी पत्रात जाहीर करण्यात येत आहे* श्री. राहुल राजेंद्र पाटील=शिवसेना तालुकाप्रमुख चाळीसगाव श्री. सागर रविंद्र चौधरी=शिवसेना शहरप्रमुख श्री. संजीव भिमराव पाटील=उपजिल्हा समन्वयक सौ. प्रतिभा साहेबराव पवार=महिला आघाडी उपजिल्हा समन्वयक सौ. अनिता किशोर शिंदे=महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ.मनीषा सोनू महाजन=महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. सुवर्णा संजय राजपूत= महिला आघाडी विधानसभा प्रमुख सौ. कल्पना नंदु शेजवळ=महिला आघाडी शहरप्रमुख *मा. भाऊसाहेब चौधरी* शिवसेना सचिव (महाराष्ट्र)

जिगंर वाडी गटार व कचऱ्याच्या समस्या वरून नागरिक संतप्त

  मुख्य संपादक:-सचिन गुंजाळ   चाळीसगाव तालुक्यातील घाट रोडवरील जिगरवाडी परिसरात गटाराची सफाई आणि कचऱ्याचे संकलन नीट न झाल्याने नागरिकांमध्ये त्रिव नाराजी पसरली आहे गटारातील सांडपाणी रस्त्यावर साचत असून कचरा वेळेवर न उचलल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डास मच्छरांचा साम्राज्य वाढले आहे यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी खोकला अशा आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार करूनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही प्रशासनाकडून केवळ विजय जाधव या कंत्राटदाराला भेटा आणि बोला असे उत्तर दिले जात आहे मात्र संबंधित कंत्राटदार विजय जाधव यांना फोन केल्यास ते कॉल उचलत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संताप निर्माण झाला आहे आम्ही दरवेळी आश्वासनावर समाधान मानायचं का समस्या त्वरित न सोडवल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे

क्षत्रिय कुलावंत शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजन*

Image
  चाळीसगाव क्षत्रिय कुलावंत शूरवीर महाराणा  प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, क्षत्रिय कुलावंत शूरवीर महाराणा प्रताप यांच्या 485 व्या.जयंतीनिमित्ताने 9 मे 2025 रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजननाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे यांच्या हस्ते क्षत्रिय कुलावंत शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रतिमेचे पूजन केले. सर्वांनी शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांचा जय जयकार केला. यावेळी चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी शूरवीर महाराणा प्रताप सिंह यांच्या जीवनावर आपल्या मनोगतात प्रकाशझोत टाकला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे ,जळगाव महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील ताल...

जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरूणाला बेड्या

Image
संपादक -सचिन गुंजाळ - जळगाव एमआयडीसी पोलिसांनी पिस्टल च्या धाकावर दहशत निर्माण करणाऱ्या  तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणी शनिवारी ३ मे रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चेतन वसंता देऊळकर असे  आरोपीचे नाव आहे कुसुंबा शहरातील साई सिटी परिसरात चेतन वसंता देऊळकर नामक तरुण गावठी पिस्टल घेऊन फिरत असलेली गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी लगेच पथकला कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवार २ मे सायंकाळी सापळा रचून संशयित आरोपी त्याच्या जवळून वीस हजार रुपये किमती चा गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त करण्यात आला याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून चेतन वसंत देऊळकर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे

छ. संभाजी महाराज जयंती चे आयोजनअखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक संपन्न*

Image
चाळीसगाव - छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ ची बैठक जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक१४ मे रोजी ची छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती निमित्ताने मीटिंग आयोजित दिनांक ५ मे रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते असे ठरले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती संभाजी महाराज यांची वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्याचे ठरले आहे. पालखीचे नियोजन हे चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथे करण्याचे ठरले आहे. तरी सर्व छत्रपती संभाजीराजे भक्तांनी पालखी सोहळ्याला उपस्थित राहावे असे आव्हान अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. या बैठकीला जिल्हा *संपर्कप्रमुख खुशाल बिडे ,महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील स्वर उपाध्यक्ष कैलास पाटील, युवक तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील तालुका युवक उपाध्यक्ष कृष्णकांत  पाटील, तालुका युवक सचिव दीप...