राष्ट्रीय विद्यालय ते जुना नाका रस्त्याची दुर्दशा पाहता तत्काळ उपाययोजना करावी मुख्याधिकारी यांच्याकडे मराठा महासंघाची मागणी*
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
चाळीसगाव (वार्ताहर) हिरापूर रोड येथील राष्ट्रीय विद्यालय ते जुना नाका पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तत्काळ उपाययोजना करावी अखिल भारतीय मराठा महासंघ ची निवेदन देऊन मागणी.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या काही दिवसापूर्वी पाऊस असल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी सासल्याने रस्ता शोधणे खूप जिकरीचे झाले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या रस्त्याने अवजड वाहनाचा देखील मोठ्या प्रमाणात ये जा आहे. शिवाय या रस्त्याने प्राथमिक, माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थी यांना देखील मोठ्या प्रमाणात येणे जाणे आहे. मात्र या रस्त्याची दयनीय अवस्था व खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहे .हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घालून जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करावी असे निवेदन चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आले. निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा देखील इशारा मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले,शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील, चाळीसगाव शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंजाळ ,पत्रकार सत्यजित पाटील आधी अखिल भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या साह्य आहे.
Comments
Post a Comment