चाळीसगांवात लाखोंचा गुटखा पकडला गुन्हेगाराला अटक

 

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 

चाळीसगाव शहर पोलिसांनी हिरापूर रोडवर मोठी कारवाई करत लाखोंच्या  गुटख्याची तस्करी उघडकीस आणली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एक बोलेरो गाडी अडवली. या गाडीच्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पीएसआय संदीप घुले, पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे आणि समाधान पाटील यांच्या पथकाने अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने ही कारवाई केली. पोलिसांनी हिरापूर रोडवर संशयास्पदरित्या थांबलेली बोलेरो गाडी थांबवून तिची कसून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. या कारवाईत वाहनचालक सलीम मुनीर खान (रा. पाचोरा) याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 पकडण्यात आलेल्या गुटख्याचे अंतिम मूल्यांकन एफडीए (अन्न व औषध प्रशासन) पथकाच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार, या जप्त गुटख्याची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे समजते. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे चाळीसगाव परिसरातील गुटखा माफियांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरात यापूर्वीही अशा कारवाया झाल्या असल्या तरी, पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्याने या तस्करीच्या मुळाशी जाण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी