20 वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीत चर्चा

 संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज



 (नव दृष्टी न्यूज)मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी कोणालाही अपेक्षा नसताना अचानक वांद्रे येथील मातोश्री निवासस्थान गाठत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वरळीतील मराठी विजयी मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले होते. मात्र, त्यानंतर मनसे ठाकरे गटाच्या युतीची चर्चा हवेतच विरून गेली का, असे वाटू लागले होते. परंतु राज ठाकरे यांनी तब्बल २० वर्षांनंतर रविवारी मातोश्री गाठत सर्वांनाच सुखद धक्का दिला आणि उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राज ठाकरे हे आज उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, रविवारी सकाळी राज ठाक रे यांनी अचानक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी