रेशन कार्ड ई-केवायसी अद्यापही केली नाही? घ्या जाणून ऑनलाइन-ऑफलाईन कसं करायचं?

संपादक -सचिन गुंजाळ 

म्हणजेच, जर तुमच्या रेशन कार्डचे ई-केवायसी केले नाही तर तुम्हाला मोफत रेशन मिळणे बंद होईल आणि तुमचे नाव रेशन कार्डमधून देखील काढून टाकले जाईल.

 नवरदृष्टी न्यूज लाईव्ह  । २३ जुलै २०२५ । देशात ओळखपत्रासाठी आवश्यक असलेले रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. केंद्र सरकारकडून देशभरातील कोट्यवधी लोकांना मोफत रेशन सुविधा दिली जात आहे. रेशन कार्डद्वारे मोफत रेशनची सुविधा मिळविण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच, जर तुमच्या रेशन कार्डचे ई-केवायसी केले नाही तर तुम्हाला मोफत रेशन मिळणे बंद होईल आणि तुमचे नाव रेशन कार्डमधून देखील काढून टाकले जाईल.


रेशन कार्डची केवायसी तुम्ही तुमच्या जवळच्यारेशन कार्डची केवायसी तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानावर जाऊनदेखील करु शकतात. दुकानावर जाऊन तुम्ही आधार कार्ड द्यायचे आहे. त्यानंतर रेशन कार्ड दुकानदार तुमची केवायसी करेल. दुकानदार पीओएस मशिनद्वारे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करेल.त्यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होणार आहे. याचसोबत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

केवायसी करण्याची ऑनलाइन पद्धत

सर्वात आधी तुम्हाला Mera KYC आणि Aadhaar FaceRD अॅप डाउनलोड करायचा आहे.

यानंतर तुमचे लोकेशन टाकायचे आहे. तुम्ही ज्या राज्याचे रहिवासी आहात ते टाकायचे आहे.

यानंतर तुम्हाला आधार नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या आधारची माहिती स्क्रिनवर दिसेल.

यानंतर तुम्ही Face e-KYC हा ऑप्शन निवडा.

यानंतर कॅमेरामधून तुमचा फेस केवायसी होईल. त्यानंतर फोटोवर क्लिक करा आणि सबमिट करा.

यानंतर तुमची रेशन कार्ड केवायसी पूर्ण होणार आहे.


ई केवायसी झाले की नाही हे या पद्धतीने करा चेक

सर्वात आधी तुम्हाला Mera KYC हे अॅप ओपन करायचे आहे.

यानंतर तुमचे लोकेशन टाका. त्यानंतर आधार नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाका.

यानंतर तुम्हाला e KYC आधीच झाले असेल तर स्टेट्‍स Y स्क्रिनवर दिसेल.

जर तुम्ही केवायसी केले नसेल तर Status: N दिसेल.

Comments