चाळीसगावात ३२ किलो गांजा पकडला, चौघांना अटक



 


संपादक -सचिन गुंजाळ:-

नवदृष्टी लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२५ । चाळीसगाव शहरात

 एका क्रूझर वाहनातून बेकायदा गांजाची तस्करी करताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी कारवाई करत तब्बल ३२ किलो गांजा जप्त केला. तर चार आरोपींना अटक केली असून या कारवाईत अंदाजे ३ लाखांचा गांजा व १२ लाख रुपये किमतीची क्रूझर गाडी असा १५ लाखांचा एकूण ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसानी रात्री ३ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींमध्ये राहुल पावरा, अख्तरसिंग पावरा, रवींद्र पावरा व पहाडसिंग पावरा (सर्व रा. शिरपूर, जि. धुळे) यांचा समावेश आहे.यापूर्वी बुधवारी चाळीसगाव शहरातच ७ लाखांचा गुटखा पकडण्यात आला होता. अवघ्या काही तासांत दुसऱ्याच रात्री मोठ्या प्रमाणात गांजासुद्धा पकडल्यामुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलिसांनी केली.

Comments