काल आमदारांचा गंभीर आरोप आज नाथाभाऊंची घोषणा डायरेक्ट चॅलेंज

 संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज





काही दिवसांपासून जळगावात राजकारण  तापले आहे. मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे  यांच्यात शाब्दिक युद्ध  पेटले आहे. हनीट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढा याच्याशी असलेल्या संबंधावरून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच काल (शुक्रवारी)महाजनांच्या समर्थनार्थ जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदारांनी पत्रकार परिषद घेत खडसेंवर आरोप करीत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज (शनिवार) एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी बोलतांना खडसे म्हणाले की, “आमदार मंगेश चव्हाण यांनी माझ्या चारित्र्यावर मोठा आरोप केला.जवळपास मी १९८० पासून ते आतापर्यंत सक्रिय राजकारणात आहे. मी जवळपास ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. गिरीश महाजन  हे मंत्री आहेत, ते अर्ध्या खात्याचे मंत्री आहे, मी बारा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. त्यांना पूर्ण खाते देखील मिळालेले नाही”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “मी मंगेश चव्हाणांना आव्हान करतो की, तुमच्याकडे माझ्यासंदर्भात एक छोटी गोष्ट देखील पुरावा म्हणून असेल तर ती समजासमोर  दाखवा, गप्पा मारू नका. जर तुम्ही पुरावा दिला तर मी सक्रिय राजकारणातून सन्यास घेईल, असे आव्हानच खडसे यांनी चव्हाण यांना दिले आहे.

तसेच ” आमदारांची ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, कर्जमाफी  विषयी झाली असती तर मला आनंद वाटला असता. परंतु, ही पत्रकार परिषद नाथाभाऊंना टार्गेट करण्यासाठी आमदारांना आणि येथील मंत्र्यांना घ्यावी लागली. त्यांना ही पत्रकार परिषद का घ्यावी लागली? त्यांची मजबुरी मी समजू शकतो. मला या आमदारांवर फार काही बोलायचं नाही, कारण आता जे आमदार आहेत, त्यांना मीच घडवलेले आहे”, असा टोलाही यावेळी खडसे यांनी लगावला.

Comments