पाऊस सुट्टीवर ! जळगाव जिल्ह्यात पावसाचं वापसी कधी होणार

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 

जळगावसह राज्यातील बहुतेक भागात सध्या पावसाने ब्रेक घेतल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून वाढलेला उकाडा त्रासदायक ठरत आहे. सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा कधी परतणार याकडे लक्ष लागले आहे नवदृष्टी लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२५ । जळगावसह राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाने ब्रेक घेतल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून वाढलेला उकाडा त्रासदायक ठरत आहे. हवामान खात्याकडून राज्यात सध्या कुठेही मुसळधार पावसाचा इशारा नाहीय.


मात्र आज (ता. 18) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. राज्याच्या इतर भागांमध्येही विजांसह हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा कधी परतणार याकडे लक्ष लागले आहे.जळगावात पावसाने पाठ फिरविल्याने उकाडा वाढला

जळगाव जिल्ह्यात जून शेवटची आणि जुलैच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. दरम्यान, यंदा पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही जिल्ह्यात अद्यापही पावसाची तूट कायम असल्यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांचीही चिंता वाढली आहे.सध्या जिल्ह्यात पावसाने ब्रेक घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली. मागच्या दोन दिवसात कमाल तापमान जवळपास ३ अंशांनी वाढले असून यातच आर्द्रतेचे प्रमाणही वाढल्याने उकाड्यात वाढ झाली. गुरुवारी जळगावचे तापमान ३३ अंशावर होते. आगामी तीन चार दिवसात तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहेकधी होणार जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन ?

दरम्यान जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने आता पावसाचे पुन्हा कधी पुनरागमन होणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अजून आठवडाभर पावसाची शक्यता कमीच असून २५ ते २६ जुलैनंतर जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. सध्या पाऊस नसल्याने तापमानात वाढ होऊन अजून उकाडा वाढण्याची शक्यता आहे.


तसेच हवामान खात्याचे प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी ३१ जुलै ते ७ ऑगस्ट कालावधीत मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या कालावधीत जळगाव जिल्ह्यातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून जुलै महिन्यातील तूट या कालावधीत भरून निघण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी