अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करत विनयभंग ; आरोपीला पीडितेच्या आईचीच साथ

 संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 




 राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच जळगाव जिल्हातुन एक धक्कादायक घटना समोर आलीय.

समोर आलीय. ज्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेत पीडित मुलीच्या आईचाच सहभाग असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भोईटे नगर परिसरातील १७ वर्षीय पीडित मुलगी आई-वडिलांसोबत राहते. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता पीडित मुलगी आणि तिची आई घरी असताना, संशयित आरोपी मयूर रमेश शिंपी (रा. कांचन नगर) हा पीडित मुलीच्या घरी आला. त्यावेळी त्याने मुलीसोबत अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यावर, आईने तिला ‘उगाच काही सांगू नकोस’ असे म्हणत दुर्लक्ष करण्यास सांगितले.

धक्कादायक बाब म्हणजे, हाच प्रकार पुन्हा २८ फेब्रुवारी आणि त्यानंतर पुन्हा १२ जून रोजी देखील वारंवार घडला. त्या वेळीही संशयित आरोपी मयूर शिंपीने पीडित मुलीचे हात पकडून विनयभंग केला. प्रत्येक वेळी पीडित मुलीच्या आईने आरोपीच्या कृत्याला समर्थन दिल्याचे समोर आले आहे. अखेर, पीडित मुलीने हा सर्व प्रकार जळगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांना सांगितला.

मुलीच्या फिर्यादीवरून तिची आई आणि संशयित आरोपी मयूर रमेश शिंपी (रा. कांचन नगर) यांच्या विरोधात पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर हे करीत आहेत. आईनेच मुलीच्या संरक्षणाऐवजी आरोपीला पाठिंबा दिल्याने रहिवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Comments