संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी मार्कटच्या समोरमायटी ब्रदर्स दुकानाजवळ 91 हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या चोरीचा तपास सुरू असताना आरोपींचा पाठलाग करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले असता. जिल्हा पेठ 3, एम आय डी सी 2, शहर पोलीस, रामानंद पोलीस स्टेशन प्रत्येकी एक असे गुन्हे उघड झाले असून 2 लाख 36 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत १४ जुलैच्या रात्री ते १५ जुलैच्या सकाळी शहरातील गोलाणी मार्केटच्या समोर मायटी ब्रदर्स दुकानासमोरील जागेतून फोर्स कंपनीचा टेम्पो, किर्लोस्कर कंपनीचा ३० किलोव्हॅटचा जनरेटर अशा ९१ हजार रुपयाच्या मुद्देमालाची चोरी झालेली होती. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमीदारामार्फत व शहरातील तसेच राष्ट्रीय महामार्ग वरील सीसीटीव्ही फुटेज माहीती काढून आरोपी हे वाहन घेवुन जामनेर, बोदवड मार्गे मलकापुर नांदुराकडे गेल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्रे फिरवत आरोपींना ताब्यात घेतले. मंगेश सुनिल मिस्तरी (वय-20, जळगाव) यश अनिल सोनार (वय 20, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील जनरेटर व्हॅन तसेच इतर ठिकाणी चोरलेली टाटा एस छोटा हत्ती, ५ मोटर सायकल असा एकूण २लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केला. त्यांच्याकडून एकुण ०७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सफौ सुनिल पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकॉ सतिश पाटील, पोहेकॉ नंदलाल पाटील, पोहेकॉ योगेश पाटील, पोहेकों विरेंद्र शिंदे, पोना भगवान पाटील, पोकॉ. अमोल ठाकुर, पोकॉ. पांचाळ, पोकॉ. प्रणय पवार, पोकों भगवान मोरे यांनी केली
Comments
Post a Comment