रिंगणगाव येथील मुलाच्या हत्याप्रकरणी आरोपींना अटक

 संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज

एरंडोल -तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय मुलाची गळा चिरूण हत्या केल्या प्रकरणी. पोलीस दोन आरोपींना अटक केली असून न्यायालयात उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे.


रिंगणगाव येथे तेरा वर्षीय बालक तेजस गजानन महाजन वय (१३) वर्ष याची गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनने तपास चक्र फिरवून दोन आरोपींना नाकेबंदी करून अटक करण्यात आली. यात हरदास ढेमश्या वासकले वय वर्ष (२८) राहणार नदिया. भगवानपूर खरगोन व दुसरा आरोपी सुरेश नकल्या खरने वय वर्ष (३५) राहणार धोपा, जिरण्या खरगोन या आरोपींना अटक करण्यात आली. सदर दोन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली. तपास एरंडोलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत असून त्यांना किरण पाटील, निलेश पाटील, अनिल पाटील, मिलिंद कुमावत सहकार्य करीत आहे.

Comments