संपादक -सचिन गुंजाळ
चाळीसगाव (वार्ताहार) अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने 6 जून 2025 रोजी चा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. याबाबत माहिती अशी की ,छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक ६ जून 2025 रोजी चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आयोजित केला होता. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाची सुरुवात भगवा झेंडा उभारून करण्यात आली.नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव तुपे यांच्या हस्ते करण्यात आली. शिवरायांची आरती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकार च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या आशा पाटील, शहर संघटक मोतीराम मांडोळे , युवक तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील ,नामदेव तुपे सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंजाळ,साहिल कोल्हे. पियुष गुंजाळ .सुमित कापसे मराठा सेवा संघाचे अरुण पाटील, कुणाल पाटील ,आधी समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment