छत्रपती संभाजीनगर मुकुंदवाडीतील खून प्रकरण: मनपाची अतिक्रमणांवर बुलडोझर कारवाई, जालना रोडही करणार अतिक्रमणमुक्त !

नवदृष्टी न्यूज लाईव्ह :- चाळीसगाव:- 

संपादक :-  सचिन गुंजाळ:-

छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात काल (१९ जून) रात्री खुनाची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आज तातडीने कारवाई सुरू केली आहे. मुकुंदवाडी परिसर आणि जालना रोडवरील  अनधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त  केली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गभिर झाल्याने प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे. 

मुकुंदवाडीत वादातून तरुणाचा खून, सविस्तर प्रकरण वाचा..... 

दुकानाच्या पाठीमागे लघुशंका करतो, असे विचारण्यावरून झालेल्या वादातून तिघांवर कोयत्याने वार करत एकाचा खून झाला. ही घटना गुरवारी (१९ जून) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ भरवस्तीत घडली. यानंतर जालना रोडवर तणावपूर्ण वातावरण होते. यात नितीन सोनबाप्पा सपकाळ (३०, रा. रजननगर , मुकुंदवाडी ) हे गभिर जखमी झाले.या प्रकरणी कुशीत चिकन शॉपमधील कामगार मस्तान कुरेशी उर्फ नन्ना भाई (रा. नय्यनगर) याच्यासह पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , नितीन आणि सचिन हे दोघे भाऊ असून ते त्यांच्या मित्रा दत्ता यांच्यासोबत मुकुंदवाडी रोडवरील एका हॉटेलमध्ये गेले होते. अर्धी पार्टी झाल्यानंतर नितीन हा लघुशंकेसाठी कुशीत चिकन शॉपच्या पाठीमागे गेला. या वेळी नन्नाने त्याला या ठिकाणी लघुशंका का करतो, असे म्हणत हटकले. त्यानंतर नितीनसह दोघेही तेथे आले आणि नन्ना आणि त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर नन्नाने चिकन कापण्यासाठी वापरला जाणारा धारदार कोयता आणून तिघांवर वार केले. यात सचिनच्या हातात, पाय, छाती आणि मानेवर गंभिर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच सिडको ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल केले. लाख उपचारादरम्यान नितीनचा मृत्यू झाला, तर इतर दोघांचीही परिस्थिती गंभिर आहे. 


आई - पत्नीला सागितले अपघात झाल्याचे कारण 

मृत नितीन यांना २ वर्षाचा मुलगा ४ वर्षाची मुलगी आहे. त्याची आई पुण्याला असल्याने नातेवाईकांनी त्यांना अपघात झाल्याचे सांगून तेथून निघून जाण्याचे सागितले . तर त्या पत्नीला घटनेची माहिती कळवली नाही.


नन्नाची पाश्र्वभूमी गुन्हेगारीवर 

या घटनेतील संशयित आरोपी मस्तान कुरेशी उर्फ नन्ना भाई हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. तो काही दिवस कारागृहातही होता, असे स्थानिकांनी सागितले.

Comments