भुसावळ येथे चोरी 19 लाखाच्या मुद्देमाला सह चोराला अटक

संपादक -सचिन गुंजाळ -नव दृष्टी  न्यूज 



जळगावः भुसावळ येथील गायत्रीनगरमधील राजस्थान मार्बलच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनचे शटर उचकटवून चोरट्यांनी 35 लाखांचा टीव्ही, वॉशिंग मशीन असे साहित्य लंपास केले. ही घटना १५ जूनरोजी घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करून 19 लाखांचा मुद्देमाल व दोघांना अटक केली.तांत्रिक विश्लेषनाद्वारे व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा मुद्देमाल पोलीस पथकाने ताब्यात घेतला. चोरीस गेलेला मुद्देमाल ज्या खासगी गोडावून मध्ये ठेवण्यात आलेला होता. त्याचे मालक मुजावर जामील शेख चांद (वय 48, रा. न्यू बोराडी, ता. शिरपूर, सध्या रा. गणेश कॉलनी, आरसी पटेल उर्दू शाळेजवळ शिरपूर), जफर शेख मुजावर (वय 24, रा. मुजावर मोहल्ला, शिरपूर, ता. शिरपूर, जि धुळे) यांना ताब्यात घेतले आहे.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने केली.

Comments