जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर फडकला तिरंगा

 संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 

चीनाब पुलाचे लोकार्पण 22 वर्षानंतर स्वप्न साकार

जम्मू काश्मीर मधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असल्याचे चिनाब पुलाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले हा रेल्वे पूर जम्मू-काश्मीरच्या विकासातील एक क्षण मानला जात आहे नदीवर या पुलाचे बांधकाम करणे खूप अवघड होते हे मात्र हे आवाहन पूर्ण करीत अभियंत्यांनी चिनाब पुलाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले तसेच काही महिन्यापूर्वी रेल्वेची यशस्वी चाचणी या पुलावरील पार पडली आज या पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुलाचे लोक अर्पण करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी २७२ किमी उधमपूर श्रीनगर -बारामुल्ला रेल्वे लिंक मधील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केले १३१५ मीटर लांबीचा हा पुल संपूर्ण प्रकल्पातील सर्वात कठीण आणि वेळखाऊ भाग होता या पुलाच्या उद्घाटना नंतर जम्मू काश्मीरच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आणि फार मोठे स्वप्न साकार झाले चिनाब पुल प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्या सरकारच्या महत्वकांशी प्रकल्पापैकी एक मानला जात होता 



पुल आयफेल टॉवर पेक्षा उंच

कश्मीर खोऱ्याची चिनाब नदीवर बांधलेला हा पुल अभियांत्रिकीचे एक अतुलनीय आणि बदलत्या भारताचे उदाहरण आहे जे पॅरिसमधील आयफेल टॉवर पेक्षाही उंच आहे हा पुल ४० किलो स्फोटके आणि ८ रिश्टर स्केल पर्यंतचा भूकंपाचा सामना करू शकतो

Comments