स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत
संपादक -सचिन गुंजाळ,नव दृष्टी न्यूज
प्रतिनिधी -साहिल कोल्हे राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांची माहिती
पावसाळा आणि पुरेशी ईव्हीएम मशीन चा अभाव कारणीभूत
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तीन टप्प्यांत घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली पावसाळा आणि ईव्हीएम मशीनचा पुरेसा नसल्याने सदर निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर -अॉक्टोबर महिन्यात घेतल्या जातील असेही त्यांनी सांगितले
दरम्यान अडीच तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६मे २०२५ रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिले होते त्यामुळे निवडणुका ऑक्टोंबर पर्यंत घेण्याचा आयोगाचा मानस आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी न्यायालय कडे करणार असल्याची वाघमारे यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे राज्य सरकारकडून लवकरच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना अंतिम केली जाईल प्रभाकर रचना 2011 च्या लोकसंख्येनुसार होईल महापालिकेसाठी संबंधित आयुक्त तर नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती साठी जिल्हाधिकाऱ्याकडून ही प्रक्रिया पार पाडली जाईल प्रभाग रचना झाल्यानंतर आरक्षण सोडत आणि त्यानंतर मतदार यादी अंतिम केली जाईल
अशी पार पडणार निवडणूक प्रक्रिया
प्रभाग रचना,प्रभाग रचनेबाबत हरकती सूचना मागवले, त्यानंतर सुचना हरकती वर सुनावणी, त्यानंतर अंतिम प्रभाग रचना अहवाल प्राप्त होईल त्यानंतर आरक्षण लॉटरी मतदारयादी तयार करणे आणि प्रत्येक्ष मतदानाचा दिवस या निवडणुकीच्या महत्त्वाच्या प्रकिया आहेत

Comments
Post a Comment