रिंगणगावच्या बालकाची हत्या

 

संपादक -सचिन गुंजाळ -नव दृष्टी न्यूज 




एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

एरंडोल । तालुक्यातील रिंगणगाव येथे एका १३ वर्षाच्या शाळकरी मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेजस गजानन महाजन असे मयत बालकाचे नाव असून, नरबळीचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तेजस महाजन हा रिंगणगाव येथे आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेतीकाम करण्यासोबतच हार्डवेअरचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी गजानन महाजन जळगावला कामानिमित्त गेले होते. त्त्यानी तेजसला दुकानावर बसण्यास सांगितले होते. परंतु तो घरी आला नाही. सोमवारी गावाचा बाजाराचा दिवस असल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली आणि एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

*रात्रभर शोध, सकाळी मृतदेह आढळला*

तेजस सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. संपूर्ण गावकऱ्यांनी रात्रभर त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर आज सकाळी सहा वाजता गावाशेजारील काटेरी झुडपांमध्ये त्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे रिंगणगाव हादरले आहे. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले आहे, प्राथमिक तपासानुसार, पोलिसांनी नरबळीच्या दिशेने तपास सुरू केला आहे, तेजसने सायंकाळी दुकानात असताना बाजारातून बिर्याणी घेतली होती आणि त्यावेळी त्याच्याजवळ काही पैसेही होते, अशी माहिती समोर आली आहे.

Comments