महाराष्ट्रातील एकूण १५१ लोक अडकले

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 






मंत्री महाजन उत्तराखंडमध्ये, राज्य सरकार यात्रेकरूंच्या संपर्कात

उत्तराखंडमधील उत्तरकाशीजिल्ह्यातील बराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पुरस्थितीमुळे महाराष्ट्रातील १५१ यात्रेकरू उत्तराखंडमध्ये अडकले आहेत, अशी माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली. यापैकी १२० पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित २१ पर्यटकांशी संपर्क साचण्यासाठी मुख्य सचिव राजेशकुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद चर्चन यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून मदतीची विनंती केली, मोबाईल नेटवर्क आणि बॅटरी चार्जिंग नसल्याने त्यांचा संपर्क होत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमारयांनी राज्य आपत्ती कक्षातून उत्तराखंडमधील यात्रेकरूंवायत आढावा घेतला. बैठकीला मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापनच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, अआपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होते

या यात्रेकरुशी संपर्क होत नाही 

ठाणे जिल्ह्यातील ५, सोलापूर-४, अहिल्यानगर-१, नाशिक-४, मालेगाव-३, चारकोप कांदिवली-६. मुंबई उपनगर-६ आणि टिटवाळ्यातील २ पर्यटकांचा अद्याप संपर्क झालेला नाही. महाराष्ट्राचे राज्य आपत्कालीन कक्ष सतत आराखंड आपती कक्षाच्या सतत संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी