उत्तर काशीमध्ये ढगफुटी काही लोकांचा मृत्यू काही बेपत्ता हेलिपॅड ही वाहुन गेले

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज




दिल्ली: उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये काल दुपारी ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता झाले आहेत. या ढगफुटीचा फटका लष्करालाही बसला आहे.लष्कराच्या हर्षिल येथील तळापासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या धराली गावामध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे तर या बरफुटीमुळे एक हेलिपॅड वाहून गेला आहे. हर्षिलमधील लष्कराच्यात


ळालाही या ढगफुटीचा फटका बसला आहे. तसेथ लष्कराचे अनेक जवानही दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत. ढगफुटीमुळे आलेल्या पाणी आणि चिखलाच्या पुरामुळे गंगोत्री धामशी रस्त्यांमार्ग असलेला संपर्क तुटला आहे. ढगफुटीमुळेखीर गंगा नदीला पूर आला. खौर गंगा नदी ही हरी शिला पर्वतावरील सात ताल परिसरातून वाहत येते. तिथेच वगफुटीची ही घटना घडली आहे. या नदीच्या उजव्या भागात धरालीचा परिसर आहे. तर डाव्या बाजूला हर्षिल येथील तेल गाट येथे लष्कराचा तळ आहे. या लष्कराच्या तळालाही ढगफुटीमुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. येथील अनेक जवान बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.हर्षिल येथे लष्कराची १४ राजरिफ यूनिट तैनात आहे. याशिवाय उत्तरकाशीपासून १८ किमी दूर अंतरावर असलेल्या नेतला येथे भूस्खलन झाल्याने धराली येथे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच हर्षिल येथे नदीकिनारी बांधण्यात आलेला हेलिपॅड वाहून गेला आहे.

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी