अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांचा सत्कार
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
चाळीसगाव( वार्ताहर) चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याबाबत माहिती अशी की,दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 11 वाजता अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपली ओळख करून दिली. तसेच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी देखील आपला परिचय करून दिला. शशिकांत पाटील साहेब व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर साहेबांनी अंमलबजावणी केली जाईल असे देखील सांगितले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे,जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील,शहर सचिव सचिन गुंजाळ,तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील,सदस्य रामराव पाटील,सत्यजित पाटील आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Comments
Post a Comment