चाळीसगाव चे सुप्रसिद्ध स्त्री रोग प्रस्तुती तज्ञ डॉ. मुकुंद करंबळेकर यांना मिलिंद विंचुरकर पुरस्कार जाहीर .
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील युवा रंगकर्मी, परभणी येथील मिलिंद विंचूरकर यांच्या मंचावरील : आकस्मिक निधनाने सर्वच कलाकार रसिकांना धक्का बसला होता. त्यांच्या स्मृतीत १९९५ पासून हौशी नाट्य कलावंत पुरस्कार सुरू करण्यात आला. १२ वा मिलिंद विंचूरकर स्मृती हौशी नाट्य कलावंतपुरस्कार चाळीसगावचे रंगकर्मी डॉ. मुकुंद करंबेळकर यांना जाहीर झाला. १७ ऑगस्टलाज्येष्ठ रंगकर्मी प्रा.डॉ. दिलीप घारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. ग्रंथमित्र भा.बा. आर्वीकर सभागृह, जीवन विकास ग्रंथालय, टिळकनगर येथे सायंकाळी ६.३० ला कार्यक्रम होईल. यावेळीगिरीश जोशी लिखित व पद्मनाभ पाठक दिग्दर्शित 'फायनल ड्राफ्ट' नाटकाचे अभिवाचन सुजाता पाठक व दिलीप घारे हे कलावंत सादर करतील.डॉ. मुकुंद करंबळेकर याचा चाळीसगाव येथील शल्य शोभा स्त्री आरोग्य भवन हॉस्पिटल आहे.या हॉस्पिटल मध्ये डॉ. मुकुंद करंबळेकर यांची पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे.या पूर्ण करंबळेकर फॅमिलीचा स्वभाव मनमिळाऊ आहे.


Comments
Post a Comment