ऑनलाइन गेमिंग बिल राज्यसभेत मंजूर

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 




ऑनलाइन‌ मनी गेम वर बंदी येणार

ऑनलाइन गेमिंग विधेयक आज संसदेच्या पावरसळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी राज्यसभेत मांडण्यात आले. ते आवाजी मतदानाने मंजूर आले. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामकाज १० मिनिटांसाठी थांबवण्यात आले. या विधेयकाचा उद्देश ई-स्पोर्टस आणि ऑनलाइन सोशल गेमिगला प्रोत्साहन देताना सर्व प्रकारच्या ऑनलाईन मनी गेमवर बंदी घालण्यात येणार आहे. महिनाभर चाललेल्या अधिवेशनात लोकसभेने १२ आणि राज्यसभेने १५ विधेयके मंजूर केली, वारंवार व्यत्यय, तहकूब आणि बहिष्कार सत्र सुरूच राहिले.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जेपीसीकडे पाठवण्यासाठी ३ विधेयके राज्यसभेत मांडली. त्यातच अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाइन गेमिंग विधेयक चर्चेसाठी मांडले, तथापि, विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. नंतर ते राज्यसभेनेही मंजूर केले. यानंतर राज्यसभादेखील अनिश्चित काळ  ासाठी तहकूब करण्यात आली. या विधेयकानुसार ई-स्पोर्ट्स गेम्सना आता कायदेशीर मान्यता देण्यात येणार आहे. अशा खेळांना सरकारप्रोत्साहन देईल, तसेच वेगवेगळ्या योजना आणल्या जातील. अँग्री बर्डस, कार्ड गेम्स, कॅज्यूअल ब्रेन गेम्स हे ऑनलाईन सोशल गेम्स आहेत. अशा गेम्सना सरक ार प्रोत्साहित करेल. मात्र, ऑनलाईन मनी गेम्सवर बंधने घालण्यात येतील, असे सांगितले. गेमिंगचे विश्व अधिक सुरक्षित व्हावे, यासाठी शिक्षेचीही तरतूद या विधेयकात करण्यात आली

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी