डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे विद्यालयात राजेंद्र वराडे सर यांना सेवानिवृत्ती निरोप*

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 




*डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे  विद्यालय, चाळीसगाव येथील ज्येष्ठ शिक्षक मा.श्री.राजेंद्र वराडे सर यांना सेवानिवृत्ती निरोप दि.३० ऑगस्ट रोजी देण्यात आला. यावेळी शाळेत आयोजित निरोप समारंभासाठी अध्यक्षस्थानी शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सचिव मा.डाॅ.सौ.शुभांगीताई पूर्णपात्रे उपस्थित होत्या. सोबत व्यासपीठावर मुख्याध्यापक रमेश सोनवणे सर,डॉ.काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पारस परदेशी सर,   बालक मंदीराच्या मुख्याध्यापिका मा.सौ.स्वाती देशपांडे मॅडम, सत्कारमूर्ती ज्येष्ठ शिक्षक मा.श्री.राजेंद्र वराडे सर,सौ. कल्पना वराडे मॅडम, रामभाऊ वराडे काका, मातोश्री इंदुताई वराडे  सहकुटुंब उपस्थित होते.*

  *यावेळी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असलेले सत्कारमूर्ती ज्येष्ठ शिक्षक मा.श्री.राजेंद्र वराडे सर पदवीधर शिक्षक यांचा संस्थेच्या सचिव मा.डाॅ.सौ.शुभांगीताई पूर्णपात्रे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक मा.श्री.रमेश सोनवणे सर यांनी त्यांच्या शैक्षणिक, कौटुंबिक व व्यावसायिक कार्याची माहिती दिली त्यांच्या जीवनात आलेले आम्ही पाहिलेले  चढउतार विषयी सविस्तर माहिती दिली  काम करत असताना शाळेची शिस्त पाळली तेव्हा दावा न करता माझं काम मला उत्कृष्ट कसं करता येईल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सतत काम करत राहिले नवीन शिक्षकांनी त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श घ्यावा व त्या पद्धतीने आपणही काम करत राहावा अध्यापन करत रहावे असे आव्हान केले  शाळेतील शिक्षक श्री.आनंद जगताप श्री.योगेश साळुंखे  श्रीमती.मनिषा पाटील मॅडम, श्रीमती.सुनिता ठोके मॅडम, श्री.आर.बी.पाटील सर व मुख्याध्यापक मा.श्री.पारस परदेशी सर यांनी वराडे सर यांच्या ३६ वर्षाच्या सेवेतील आठवणींना उजाळा दिला.* 

*अध्यक्षीय मनोगतात मा.डाॅ.सौ.शुभांगीताई पूर्णपात्रे यांनी निष्ठेने कर्तव्य पूर्ण केल्यास सेवेचा पूर्णानंद मिळतो याबाबत माहिती देऊन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना मा.श्री.राजेंद्र वराडे सरांनी आपल्या सेवेतील आठवणींना उजाळा दिला व संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षा डॉक्टर प्रमिलाताई पूर्णपात्रे काकासाहेब पूर्ण पात्रे बापूसाहेब पूर्ण पात्रे व हेमांगी ताई पूर्णपात्रे यांचे सदैव ऋणी राहील असे सांगितले  मुख्याध्यापक रमेश सोनवणे,मा. मुख्याध्यापिका भारतीय जोशी मॅडम , सर्व आजी-माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, यांनी देखील  केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राकेश चित्ते सर यांनी केले,आभार श्रीमती.मनिषा पाटील मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.*

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी