Posts

Showing posts from July, 2025

राष्ट्रीय विद्यालय ते जुना नाका रस्त्याची दुर्दशा पाहता तत्काळ उपाययोजना करावी मुख्याधिकारी यांच्याकडे मराठा महासंघाची मागणी*

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  चाळीसगाव (वार्ताहर) हिरापूर रोड येथील राष्ट्रीय विद्यालय ते जुना नाका पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तत्काळ उपाययोजना करावी अखिल भारतीय मराठा महासंघ ची निवेदन देऊन मागणी.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या काही दिवसापूर्वी पाऊस असल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी सासल्याने रस्ता शोधणे खूप जिकरीचे झाले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या रस्त्याने अवजड वाहनाचा देखील मोठ्या प्रमाणात ये जा आहे. शिवाय या रस्त्याने प्राथमिक, माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थी यांना देखील मोठ्या प्रमाणात येणे जाणे आहे.  मात्र या रस्त्याची दयनीय अवस्था व खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहे .हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घालून जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करावी असे निवेदन चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आले. निवेदनाची तात्काळ दखल न घेतल...

भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यास अटक धरणगाव तालुक्यातील भवरखेडा गावांतील घटणा

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज   भवरखेडा गावात घातक रसायनांपासून कृत्रिम दूध उत्पादन करून विक्री करणाऱ्या तरुणाला अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सोमनाथ आनंदा माळी (वय 31) असे आहे. तो भेसळयुक्त दूध तयार करत असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांना मिळाल्यानंतर त्यांनी धरणगाव पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने भवरखेडा येथे छापा टाकला. छाप्यात माळीच्या घरी भेसळीच्या दुधासाठी वापरली जाणारी रसायने आणि उपकरणे आढळून आली. प्राथमिक चौकशीत माळीने भेसळयुक्त दूध तयार करून विक्री करत असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

पुण्यात रेव पार्टीचा पर्दाफाश आरोपींना पकडले

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  खडसेंच्या जावई सह ७ जण अटकेत; कोकेन.गांजा.हुक्का जप्त खराडी येथील फ्लॅटवर शनिचारी रात्री उशिरा पुणे पोलिसांनी टाकलेल्या घाडीत गाजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयासह ७ जणांवर कारवाई केली, रात्री उशिरा केलेल्या या कारवाईत पालिसांनी कोकेन, गांजा, हुक्का, दारू या अमली पदार्थासह काही साहित्यही गप्पा केले. यात मागी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याने खळबळ उडाली. बावरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, ना प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत प्रांजल खेवलकरांसह सावही आरोपींना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुण्यातील उन्य बस्ती असलेल्या खराडीतील स्टेवर्ड अधुर सूट येथे एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीत ५ पुरुष आणि २ महिलांचा समावेश होता. पार्टीव अंमली पदार्थ, पुरू, इक्का बांचे सेवन सुरू होते. हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरू होती. त्यावेळी रविवारीपहाटे साडेतीनच्या सुमारास गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कई प्रांजल खेवलकर यांच्यासह २ महिला व ५ पुरुषांसह जर्...

20 वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीत चर्चा

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  (नव दृष्टी न्यूज)मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी कोणालाही अपेक्षा नसताना अचानक वांद्रे येथील मातोश्री निवासस्थान गाठत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वरळीतील मराठी विजयी मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले होते. मात्र, त्यानंतर मनसे ठाकरे गटाच्या युतीची चर्चा हवेतच विरून गेली का, असे वाटू लागले होते. परंतु राज ठाकरे यांनी तब्बल २० वर्षांनंतर रविवारी मातोश्री गाठत सर्वांनाच सुखद धक्का दिला आणि उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे हे आज उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, रविवारी सकाळी राज ठाक रे यांनी अचानक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यातील ७ खासदारांचा 'संसदरत्न'ने गौरव जळगांवच्या खासदार स्मिताताई वाघ यांचा पण समावेश

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज ( नव दृष्टी न्यूज)देशातील १७ खासदारांना यंदाचा 'संसदरत्न पुरस्कार २०२५' जाहीर झाला आहे. यंदा 'संसदरत्न' पुरस्कारांसाठी महाराष्ट्राने बाजी मारली असून महाराष्ट्रातील ७ खासदारांनी या यादीत स्थान पटकावले आ-हे. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी 'प्राईम पॉईंट फाऊंडेशन' या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. या संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राने यंदाही बाजी मारली आहे. यात सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांना पु रस्कार जाहीर झाला. तसेच अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांनाही संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. लोकसभेतील विशेष योगदानाची दखल घेत हा पुरस्कार दिला जातो. १६ व्या लोकसभेनंतर सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल एकूण १७खासदारांना हा विशेष पुरस्कार देण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे (महाराष्ट्र), शिवसेना नेते श्रीरंगअप्पा बारणे (महाराष्ट्र), भाजपाच्या स्मि...

काल आमदारांचा गंभीर आरोप आज नाथाभाऊंची घोषणा डायरेक्ट चॅलेंज

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज काही दिवसांपासून जळगावात राजकारण  तापले आहे. मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे  यांच्यात शाब्दिक युद्ध  पेटले आहे. हनीट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढा याच्याशी असलेल्या संबंधावरून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच काल (शुक्रवारी)महाजनांच्या समर्थनार्थ जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदारांनी पत्रकार परिषद घेत खडसेंवर आरोप करीत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज (शनिवार) एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलतांना खडसे म्हणाले की, “आमदार मंगेश चव्हाण यांनी माझ्या चारित्र्यावर मोठा आरोप केला.जवळपास मी १९८० पासून ते आतापर्यंत सक्रिय राजकारणात आहे. मी जवळपास ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. गिरीश महाजन  हे मंत्री आहेत, ते अर्ध्या खात्याचे मंत्री आहे, मी बारा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. त्यांना पूर्ण खाते देखील मिळालेले नाही”, असे त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, “मी मंगेश चव्हाणांना आव्हान करतो की, तुमच्याकडे माझ्यासंदर्भात एक छोटी गोष्ट देखील प...

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करत विनयभंग ; आरोपीला पीडितेच्या आईचीच साथ

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज   राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच जळगाव जिल्हातुन एक धक्कादायक घटना समोर आलीय. समोर आलीय. ज्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेत पीडित मुलीच्या आईचाच सहभाग असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भोईटे नगर परिसरातील १७ वर्षीय पीडित मुलगी आई-वडिलांसोबत राहते. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता पीडित मुलगी आणि तिची आई घरी असताना, संशयित आरोपी मयूर रमेश शिंपी (रा. कांचन नगर) हा पीडित मुलीच्या घरी आला. त्यावेळी त्याने मुलीसोबत अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यावर, आईने तिला ‘उगाच काही सांगू नकोस’ असे म्हणत दुर्लक्ष करण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, हाच प्रकार पुन्हा २८ फेब्रुवारी आणि त्यानंतर पुन्हा १२ जून रोजी देखील वारंवार घडला. त्या वेळीही संशयित आरोपी मयूर शिंपीन...

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज चाळीसगाव (25 जुलै 2025) : मडी ड्रग्जमध्ये उत्तेजक द्रव्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या अँफेटामाइर्नचा तब्बल 39 किलोचा साठा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कन्नड घाटातून एका वाहनातून जप्त केला आहे. या साठ्याची किंमत सुमारे 60 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हा साठा दिल्ली नेल्यानंतर दिल्लीहून इंदूर, धुळे, संभाजीनगरमार्गे हा साठा बंगळुरूला पोहोचणार होता मात्र तत्पूर्वीच झालेल्या कारवाईने मोठे नुकसान टळले आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील कन्नड घाटाजवळ महामार्ग पोलिस मदत केंद्रासमोर नाकाबंदीदरम्यान चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी दिल्लीहून बंगळुरूकडे जाणाऱ्या ब्रेझा कार (डी.एल.बी.बी.7771) मधून जाणारा 39 किलो अँफेटामाईनचा साठा जप्त केला. जवळपास 40 ते 60 कोटींचा हा साठा असल्याची माहिती उपनिरीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली. कारमधील सीटवर दोन ते तीन बॅगमध्ये हे अँफेटामाइन ठेवलेले होते. याप्रकरणी दिल्ली येथील सय्यद नामक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तेजक म्हणून अँफेटामाइनचा वापर अँफेटामाइनचा वापर एमडी ड्रग्जमध्ये...

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

संपादक -सचिन गुंजाळ  मुंबई, दि. २३ (नव दृष्टी न्यूज):- बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि २७ जुलै पर्यंत तो मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) २५-२६ जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकणात आणि मध्य महामाष्ट्रातील घाट परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ लगतच्या पूर्व मराठवाळ्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर उर्वरित मराठवाडा आणि खानदेशात देखील पावसाचा अंदाज आहे. पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच कोकणातील सर्वच जिल्हे नाशिक, पुणे, आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील बा दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. सध्याच्या अंदाजानुसार २६ तारखेला पावसाचे प्रमाण सर्वांत अधिक असण्याची शक्यता आहे. २५-२६ जुलै दरम्यान पूर्व ...

जळगांव महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघ नराधमाकडुन सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज   जळगाव जिल्ह्यातील सावळ तालुक्यातील ग्रामखेडी रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले.जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका गावात एक ३५ वर्षीय महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्यावेळी एका रोडने चालत जात होती. यावेळी तिथे तिघांनी या महिलेला अडवले आणि तुम्हाला आम्ही घरी सोडतो असं सांगितले. या तिघांनी त्या महिलेला जंगलात नेऊन महिलेवर सामुहिक अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिला घटनेच्या दिवशी २० तारखेला आपल्या मुलासह मावशीला भेटायला गेली होती. पण तिला पुन्हा आपल्या घरी येण्यास उशीर झाला. यावेळी पीडितेच्या मावशी एका कारमधून महिलेला घरी पाठवलं. संबंधित लोक तुला घरी सोडतील, असंही मावशीने सांगितलं. पण काही अंतर दूर गेल्यानंतर आरोपींची नियत बदलली. ते तिला जंगलात घेऊन गेले. जंगलात घेऊन जाऊन सामुहिक अत्याचार केले.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाने आणि शंकर भगवानसिंग भिलाले (तिघेही रा. भुसावळ) यांनी तिला घरी सोडण्याचा बहाणा केला आणि कारम...

रेशन कार्ड ई-केवायसी अद्यापही केली नाही? घ्या जाणून ऑनलाइन-ऑफलाईन कसं करायचं?

संपादक -सचिन गुंजाळ  म्हणजेच, जर तुमच्या रेशन कार्डचे ई-केवायसी केले नाही तर तुम्हाला मोफत रेशन मिळणे बंद होईल आणि तुमचे नाव रेशन कार्डमधून देखील काढून टाकले जाईल.  नवरदृष्टी न्यूज लाईव्ह  । २३ जुलै २०२५ । देशात ओळखपत्रासाठी आवश्यक असलेले रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. केंद्र सरकारकडून देशभरातील कोट्यवधी लोकांना मोफत रेशन सुविधा दिली जात आहे. रेशन कार्डद्वारे मोफत रेशनची सुविधा मिळविण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच, जर तुमच्या रेशन कार्डचे ई-केवायसी केले नाही तर तुम्हाला मोफत रेशन मिळणे बंद होईल आणि तुमचे नाव रेशन कार्डमधून देखील काढून टाकले जाईल. रेशन कार्डची केवायसी तुम्ही तुमच्या जवळच्यारेशन कार्डची केवायसी तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानावर जाऊनदेखील करु शकतात. दुकानावर जाऊन तुम्ही आधार कार्ड द्यायचे आहे. त्यानंतर रेशन कार्ड दुकानदार तुमची केवायसी करेल. दुकानदार पीओएस मशिनद्वारे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करेल.त्यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होणार आहे. याचसोबत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. केवायसी करण्याची ऑनलाइन पद्धत सर्...

चोरट्यांकडून 7 गुन्हे उघड 2 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी मार्कटच्या समोरमायटी ब्रदर्स दुकानाजवळ 91 हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या चोरीचा तपास सुरू असताना आरोपींचा पाठलाग करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले असता. जिल्हा पेठ 3, एम आय डी सी 2, शहर पोलीस, रामानंद पोलीस स्टेशन प्रत्येकी एक असे गुन्हे उघड झाले असून 2 लाख 36 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत १४ जुलैच्या रात्री ते १५ जुलैच्या सकाळी शहरातील गोलाणी मार्केटच्या समोर मायटी ब्रदर्स दुकानासमोरील जागेतून फोर्स कंपनीचा टेम्पो, किर्लोस्कर कंपनीचा ३० किलोव्हॅटचा जनरेटर अशा ९१ हजार रुपयाच्या मुद्देमालाची चोरी झालेली होती. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त बातमीदारामार्फत व शहरातील तसेच राष्ट्रीय महामार्ग वरील सीसीटीव्ही फुटेज माहीती काढून आरोपी हे वाहन घेवुन जामनेर, बोदवड मार्गे मलकापुर नांदुराकडे गेल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्रे फिरवत आरोपींना ताब्यात घेतले. मंगेश सुनिल...

पाऊस सुट्टीवर ! जळगाव जिल्ह्यात पावसाचं वापसी कधी होणार

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  जळगावसह राज्यातील बहुतेक भागात सध्या पावसाने ब्रेक घेतल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून वाढलेला उकाडा त्रासदायक ठरत आहे. सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा कधी परतणार याकडे लक्ष लागले आहे नवदृष्टी लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२५ । जळगावसह राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाने ब्रेक घेतल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून वाढलेला उकाडा त्रासदायक ठरत आहे. हवामान खात्याकडून राज्यात सध्या कुठेही मुसळधार पावसाचा इशारा नाहीय. मात्र आज (ता. 18) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. राज्याच्या इतर भागांमध्येही विजांसह हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा कधी परतणार याकडे लक्ष लागले आहे.जळगावात पावसाने पाठ फिरविल्याने उकाडा वाढला जळगाव जिल्ह्यात जून शेवटची आणि जुलैच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. दरम्यान, यंदा पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही जिल्ह्यात अद्यापही पावसाच...

चाळीसगावात ३२ किलो गांजा पकडला, चौघांना अटक

Image
  संपादक -सचिन गुंजाळ:- नवदृष्टी लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२५ । चाळीसगाव शहरात  एका क्रूझर वाहनातून बेकायदा गांजाची तस्करी करताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी कारवाई करत तब्बल ३२ किलो गांजा जप्त केला. तर चार आरोपींना अटक केली असून या कारवाईत अंदाजे ३ लाखांचा गांजा व १२ लाख रुपये किमतीची क्रूझर गाडी असा १५ लाखांचा एकूण ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसानी रात्री ३ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींमध्ये राहुल पावरा, अख्तरसिंग पावरा, रवींद्र पावरा व पहाडसिंग पावरा (सर्व रा. शिरपूर, जि. धुळे) यांचा समावेश आहे.यापूर्वी बुधवारी चाळीसगाव शहरातच ७ लाखांचा गुटखा पकडण्यात आला होता. अवघ्या काही तासांत दुसऱ्याच रात्री मोठ्या प्रमाणात गांजासुद्धा पकडल्यामुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलिसांनी केली.

चाळीसगांवात लाखोंचा गुटखा पकडला गुन्हेगाराला अटक

  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  चाळीसगाव शहर पोलिसांनी हिरापूर रोडवर मोठी कारवाई करत लाखोंच्या  गुटख्याची तस्करी उघडकीस आणली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एक बोलेरो गाडी अडवली. या गाडीच्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पीएसआय संदीप घुले, पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे आणि समाधान पाटील यांच्या पथकाने अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने ही कारवाई केली. पोलिसांनी हिरापूर रोडवर संशयास्पदरित्या थांबलेली बोलेरो गाडी थांबवून तिची कसून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. या कारवाईत वाहनचालक सलीम मुनीर खान (रा. पाचोरा) याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.  पकडण्यात आलेल्या गुटख्याचे अंतिम मूल्यांकन एफडीए (अन्न व औषध प्रशासन) पथकाच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. मात्र, प्र...