Posts

Showing posts from June, 2025

छ.शाहू महाराज जयंती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने साजरी

Image
 चाळीसगाव (वार्ताहार) राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय क्रिकेट महासंघाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात येऊन जयंती साजरी करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे  की, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या.जयंतीनिमित्ताने २६ जून 2025 रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव चिन येथील शासकीय चाळीसगाव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजननाचे आयोजन करण्यात आले होते ..यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे  यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू  यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रतिमेचे पूजन केले.राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जय जयकार केला. यावेळी चाळीसगाव शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज  यांच्या जीवनावर आपल्या मनोगतात प्रकाशझोत टाकला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बडे महिला बाई जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले,चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील,शहर उपाध्यक्...

छत्रपती संभाजीनगर मुकुंदवाडीतील खून प्रकरण: मनपाची अतिक्रमणांवर बुलडोझर कारवाई, जालना रोडही करणार अतिक्रमणमुक्त !

नवदृष्टी न्यूज लाईव्ह :- चाळीसगाव:-  संपादक :-  सचिन गुंजाळ:- छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात काल (१९ जून) रात्री खुनाची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आज तातडीने कारवाई सुरू केली आहे. मुकुंदवाडी परिसर आणि जालना रोडवरील  अनधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त  केली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गभिर झाल्याने प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे.  मुकुंदवाडीत वादातून तरुणाचा खून, सविस्तर प्रकरण वाचा.....  दुकानाच्या पाठीमागे लघुशंका करतो, असे विचारण्यावरून झालेल्या वादातून तिघांवर कोयत्याने वार करत एकाचा खून झाला. ही घटना गुरवारी (१९ जून) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ भरवस्तीत घडली. यानंतर जालना रोडवर तणावपूर्ण वातावरण होते. यात नितीन सोनबाप्पा सपकाळ (३०, रा. रजननगर , मुकुंदवाडी ) हे गभिर जखमी झाले.या प्रकरणी कुशीत चिकन शॉपमधील कामगार मस्तान कुरेशी उर्फ नन्ना भाई (रा. नय्यनगर) याच्यासह पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , नितीन आणि सचिन...

भुसावळ येथे चोरी 19 लाखाच्या मुद्देमाला सह चोराला अटक

Image
संपादक -सचिन गुंजाळ -नव दृष्टी  न्यूज  जळगावः भुसावळ येथील गायत्रीनगरमधील राजस्थान मार्बलच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनचे शटर उचकटवून चोरट्यांनी 35 लाखांचा टीव्ही, वॉशिंग मशीन असे साहित्य लंपास केले. ही घटना १५ जूनरोजी घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करून 19 लाखांचा मुद्देमाल व दोघांना अटक केली.तांत्रिक विश्लेषनाद्वारे व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा मुद्देमाल पोलीस पथकाने ताब्यात घेतला. चोरीस गेलेला मुद्देमाल ज्या खासगी गोडावून मध्ये ठेवण्यात आलेला होता. त्याचे मालक मुजावर जामील शेख चांद (वय 48, रा. न्यू बोराडी, ता. शिरपूर, सध्या रा. गणेश कॉलनी, आरसी पटेल उर्दू शाळेजवळ शिरपूर), जफर शेख मुजावर (वय 24, रा. मुजावर मोहल्ला, शिरपूर, ता. शिरपूर, जि धुळे) यांना ताब्यात घेतले आहे.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने केली.

राज्यात मुसळधार पाऊस

Image
  संपादक -सचिन गुंजाळ -नव दृष्टी न्यूज  कोकणासह नाशिक पुण्याला झोडपले -गोदावरी -मुळा- मुठा इंद्रायणीला पुर मुंबई/पुणे/नाशिक  मराठवाडा सोडत राज्याच्या विविध भागात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मुंबई, पुणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक भागांत रस्ते तुंबले असून, काही भागांत रस्त्यांवर कंबरेइतके पाणी साचले आहे. कोकणात सर्वच नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. नाशिक, पुण्यातही नद्यांना पूर आला असून, सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मदतकार्यही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्याने या भागातील नद्या हीदुथडी भरून वाहात आहेत, मात्र, मराठवाड्याच्या नशिबी प्रतीक्षा कायम आहे. जगबुडीने ओलांडली धोक्याचे पातळी रायगड जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नगरपरिषदेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. जगबुडीचे पाणी मटन मार्केटमध्ये शिरले, नदी शेजारील सर्व्हिस रोड पाण्याखाली ग...

रिंगणगाव येथील मुलाच्या हत्याप्रकरणी आरोपींना अटक

  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज एरंडोल -तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय मुलाची गळा चिरूण हत्या केल्या प्रकरणी. पोलीस दोन आरोपींना अटक केली असून न्यायालयात उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे. रिंगणगाव येथे तेरा वर्षीय बालक तेजस गजानन महाजन वय (१३) वर्ष याची गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनने तपास चक्र फिरवून दोन आरोपींना नाकेबंदी करून अटक करण्यात आली. यात हरदास ढेमश्या वासकले वय वर्ष (२८) राहणार नदिया. भगवानपूर खरगोन व दुसरा आरोपी सुरेश नकल्या खरने वय वर्ष (३५) राहणार धोपा, जिरण्या खरगोन या आरोपींना अटक करण्यात आली. सदर दोन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली. तपास एरंडोलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत असून त्यांना किरण पाटील, निलेश पाटील, अनिल पाटील, मिलिंद कुमावत सहकार्य करीत आहे.

मुंबईत आलो तर परतणार नाही

Image
संपादक -सचिन गुंजाळ -नव दृष्टी न्यूज  मराठा आरक्षणासाठी मनोज जंरागे चा आरपारचा इशारा मराठा आरक्षणासाठी आंतरावली सराटी येथे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी केली आणि जात पडताळणी प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्याची सूचना केली, जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम राहत, मी मुंबईला आलो, तर परत जाणार नाही, असा थेट इशारा दिला. जरांगे पाटील यांनी शिरसाट यांच्यासमोर अधिकाऱ्यांच्या चालढकलीवर नाराजी व्यक्त केली, सरकार काम करते, पण काही अधिकारी सामाजिक न्याय विभाग आणि सरकारला बदनाम करतात. नोंदी असूनही जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विलंब केला जातो, ज्यामु‌ळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, असे ते म्हणाले. यावर शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभाग आणि मुख्य सचिवांना तातडीने प्रमाणपत्रांचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र...

रिंगणगावच्या बालकाची हत्या

Image
  संपादक -सचिन गुंजाळ -नव दृष्टी न्यूज  एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको एरंडोल । तालुक्यातील रिंगणगाव येथे एका १३ वर्षाच्या शाळकरी मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेजस गजानन महाजन असे मयत बालकाचे नाव असून, नरबळीचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तेजस महाजन हा रिंगणगाव येथे आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेतीकाम करण्यासोबतच हार्डवेअरचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी गजानन महाजन जळगावला कामानिमित्त गेले होते. त्त्यानी तेजसला दुकानावर बसण्यास सांगितले होते. परंतु तो घरी आला नाही. सोमवारी गावाचा बाजाराचा दिवस असल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली आणि एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. * रात्रभर शोध, सकाळी मृतदेह आढळला * तेजस सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. संपूर्ण गावकऱ्यांनी रात्रभर त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर आज सकाळी सहा वाजता गावाशेजारील काटेरी झुडपांमध्ये त्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळू...

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून शशिकांत पाटील लवकरच चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पदभार सांभाळणार

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण म्हणून शशिकांत पाटील हे लवकरच पदभार सांभाळणार आहे शशिकांत पाटील हे जळगाव येथे लाज लुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी असताना त्यांनी अनेक लाचखोरांना आपला हिसका दाखविला आहे एक अत्यंत प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांची पदस्थापना ही तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे मात्र लवकरच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण म्हणून त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघणार आहे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : किडनी विकाराने ग्रस्त महिलेच्या मदतीसाठी धावले एकनाथ शिंदे

Image
संपादक:-सचिन गुंजाळ,नव दृष्टी न्यूज  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे काल (शुक्रवार) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अडचणीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. दौरा आटपून मुंबईला  परतण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे जळगाव विमानतळावर पोहोचले. मात्र, यावेळ पायलटने विमान चालवण्यास नकार दिल्याने तब्बल ५० मिनिटं एकनाथ शिंदे यांना  उभे राहावे लागले. शिंदे यांच्या विलंबामुळे मात्र एका महिलेला  जीवदान मिळाले आहे. शीतल पाटील  असे या महिलेचे नाव असून, त्या किडनी विकाराने त्रस्त होत्या. किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यासाठीच त्या विमानाने मुंबईकडे निघाल्या होत्या. किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी शीतल याना तात्काळ मुंबईत पोहोचायचे होते. परंतु, त्या विमानतळावर  पोहोचण्याआधीच मुंबईकडे जाणारे विमान निघून गेल्याचे त्यांना समजले. मुंबईत लवकर पोहोचणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते  यानंतर त्यांना आपली किडणी ट्रान्सप्लांटची शस...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत

Image
संपादक -सचिन गुंजाळ,नव दृष्टी न्यूज  प्रतिनिधी -साहिल कोल्हे राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांची माहिती पावसाळा आणि पुरेशी ईव्हीएम मशीन चा अभाव कारणीभूत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तीन टप्प्यांत घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली पावसाळा आणि ईव्हीएम मशीनचा पुरेसा नसल्याने सदर निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर -अॉक्टोबर महिन्यात घेतल्या जातील असेही त्यांनी सांगितले दरम्यान अडीच तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६मे २०२५ रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिले होते त्यामुळे निवडणुका ऑक्टोंबर पर्यंत घेण्याचा आयोगाचा  मानस आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी न्यायालय कडे करणार असल्याची वाघमारे यांनी स्पष्ट...

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर फडकला तिरंगा

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  चीनाब पुलाचे लोकार्पण 22 वर्षानंतर स्वप्न साकार जम्मू काश्मीर मधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असल्याचे चिनाब पुलाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले हा रेल्वे पूर जम्मू-काश्मीरच्या विकासातील एक क्षण मानला जात आहे नदीवर या पुलाचे बांधकाम करणे खूप अवघड होते हे मात्र हे आवाहन पूर्ण करीत अभियंत्यांनी चिनाब पुलाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले तसेच काही महिन्यापूर्वी रेल्वेची यशस्वी चाचणी या पुलावरील पार पडली आज या पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुलाचे लोक अर्पण करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी २७२ किमी उधमपूर श्रीनगर -बारामुल्ला रेल्वे लिंक मधील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केले १३१५ मीटर लांबीचा हा पुल संपूर्ण प्रकल्पातील सर्वात कठीण आणि वेळखाऊ भाग होता या पुलाच्या उद्घाटना नंतर जम्मू काश्मीरच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आणि फार मोठे स्वप्न साकार झाले चिनाब पुल प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्या सरकारच्या महत्वकांशी प्रकल्पापैकी एक मानला जा...

भा .मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा*

  संपादक -सचिन गुंजाळ   चाळीसगाव (वार्ताहार) अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने 6 जून 2025 रोजी चा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. याबाबत माहिती अशी की ,छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक ६ जून 2025 रोजी चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आयोजित केला होता. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाची सुरुवात भगवा झेंडा उभारून करण्यात आली.नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच  मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव तुपे यांच्या हस्ते करण्यात आली. शिवरायांची आरती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकार च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या आशा पाटील, शहर संघटक मोतीराम मांडोळे , यु...