Posts

Showing posts from August, 2025

डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे विद्यालयात राजेंद्र वराडे सर यांना सेवानिवृत्ती निरोप*

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  *डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे  विद्यालय, चाळीसगाव येथील ज्येष्ठ शिक्षक मा.श्री.राजेंद्र वराडे सर यांना सेवानिवृत्ती निरोप दि.३० ऑगस्ट रोजी देण्यात आला. यावेळी शाळेत आयोजित निरोप समारंभासाठी अध्यक्षस्थानी शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सचिव मा.डाॅ.सौ.शुभांगीताई पूर्णपात्रे उपस्थित होत्या. सोबत व्यासपीठावर मुख्याध्यापक रमेश सोनवणे सर,डॉ.काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पारस परदेशी सर,   बालक मंदीराच्या मुख्याध्यापिका मा.सौ.स्वाती देशपांडे मॅडम, सत्कारमूर्ती ज्येष्ठ शिक्षक मा.श्री.राजेंद्र वराडे सर,सौ. कल्पना वराडे मॅडम, रामभाऊ वराडे काका, मातोश्री इंदुताई वराडे  सहकुटुंब उपस्थित होते.*   *यावेळी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असलेले सत्कारमूर्ती ज्येष्ठ शिक्षक मा.श्री.राजेंद्र वराडे सर पदवीधर शिक्षक यांचा संस्थेच्या सचिव मा.डाॅ.सौ.शुभांगीताई पूर्णपात्रे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक मा.श्री.रमेश सोनवणे सर यांनी त्या...

माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांची काढलीं धिंड

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज चाळीसगाव तालुक्यातील  माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर २६ ऑगस्ट रोजी कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला होता. या गंभीर घटनेनंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी सोमा उर्फ सागर चौधरी याच्यासह हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी अशा तिघांना सापळा रचून अटक केली आहे. आरोपींना रात्री उशिरा पकडण्यात आले, ज्यामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला. आरोपींची काढली धिंड ज्या पद्धतीने आरोपींनी भरदिवसा माजी नगरसेवकावर हल्ला करून शहरात दहशत निर्माण केली होती, ती कमी करण्यासाठी पोलिसांनी एक कठोर पाऊल उचलले. रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पोलिसांनी अटक केलेल्या या तिन्ही आरोपींची शहरातून पायी धिंड काढली. पोलिसांनी काढलेल्या या धिंडीमुळे आरोपींना चांगलीच अद्दल घडली असून, त्यांच्यातील दहशत संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला. ही कारवाई पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी आरोपींची धिंड काढल्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने...

ऑनलाइन गेमिंग बिल राज्यसभेत मंजूर

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  ऑनलाइन‌ मनी गेम वर बंदी येणार ऑनलाइन गेमिंग विधेयक आज संसदेच्या पावरसळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी राज्यसभेत मांडण्यात आले. ते आवाजी मतदानाने मंजूर आले. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामकाज १० मिनिटांसाठी थांबवण्यात आले. या विधेयकाचा उद्देश ई-स्पोर्टस आणि ऑनलाइन सोशल गेमिगला प्रोत्साहन देताना सर्व प्रकारच्या ऑनलाईन मनी गेमवर बंदी घालण्यात येणार आहे. महिनाभर चाललेल्या अधिवेशनात लोकसभेने १२ आणि राज्यसभेने १५ विधेयके मंजूर केली, वारंवार व्यत्यय, तहकूब आणि बहिष्कार सत्र सुरूच राहिले.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जेपीसीकडे पाठवण्यासाठी ३ विधेयके राज्यसभेत मांडली. त्यातच अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाइन गेमिंग विधेयक चर्चेसाठी मांडले, तथापि, विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. नंतर ते राज्यसभेनेही मंजूर केले. यानंतर राज्यसभादेखील अनिश्चित काळ  ासाठी तहकूब करण्यात आली. या विधेयकानुसार ई-स्पोर्ट्स गेम्सना आता कायदेशीर मान्यता देण्यात येणार आहे. अशा खेळांना सरकारप्रोत्साहन देईल, तसेच वेगवेगळ्या योजना आणल...

शिव सेना उबाठा ला खिंडार वैशालीताई सुर्यवंशी भाजपमध्ये पक्ष प्रवेश निश्चित दि.१९ रोजी मुंबईत पक्ष प्रवेश

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  नव दृष्टी न्यूज:शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या आपल्या पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे ठरले झाले आहे. यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेना-उबाठा पक्षाला जोरदार हादरा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून उद्या दिनांक १९ ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजीत कार्यक्रमात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या सोबत त्यांचे समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. वैशालीताई सुर्यवंशी या माजी आमदार कै. आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या असून राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय झाल्या होत्या. त्यांनी गेल्या वर्षीची विधानसभा निवडणूक देखील शिवसेना-उबाठा कडून लढविली होती. यात त्यांना अपयश येऊन त्यांचे चुलत ...

चाळीसगाव चे सुप्रसिद्ध स्त्री रोग प्रस्तुती तज्ञ डॉ. मुकुंद करंबळेकर यांना मिलिंद विंचुरकर पुरस्कार जाहीर .

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील युवा रंगकर्मी, परभणी येथील   मिलिंद विंचूरकर  यांच्या मंचावरील : आकस्मिक निधनाने सर्वच कलाकार रसिकांना धक्का बसला होता. त्यांच्या स्मृतीत १९९५ पासून हौशी नाट्य कलावंत पुरस्कार सुरू करण्यात आला. १२ वा मिलिंद विंचूरकर स्मृती हौशी नाट्य कलावंतपुरस्कार चाळीसगावचे रंगकर्मी डॉ. मुकुंद करंबेळकर यांना जाहीर झाला. १७ ऑगस्टलाज्येष्ठ रंगकर्मी प्रा.डॉ. दिलीप घारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. ग्रंथमित्र भा.बा. आर्वीकर सभागृह, जीवन विकास ग्रंथालय, टिळकनगर येथे सायंकाळी ६.३० ला कार्यक्रम होईल. यावेळीगिरीश जोशी लिखित व पद्मनाभ पाठक दिग्दर्शित 'फायनल ड्राफ्ट' नाटकाचे अभिवाचन सुजाता पाठक व दिलीप घारे हे कलावंत सादर करतील.डॉ. मुकुंद करंबळेकर याचा चाळीसगाव येथील शल्य शोभा स्त्री आरोग्य भवन हॉस्पिटल आहे.या हॉस्पिटल मध्ये डॉ. मुकुंद करंबळेकर यांची पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे.या पूर्ण करंबळेकर फॅमिलीचा स्वभाव मनमिळाऊ आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांचा सत्कार

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  चाळीसगाव( वार्ताहर) चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याबाबत माहिती अशी की,दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 11 वाजता अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपली ओळख करून दिली. तसेच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी देखील आपला परिचय करून दिला.  शशिकांत पाटील साहेब व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर साहेबांनी अंमलबजावणी केली जाईल असे देखील सांगितले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे,जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील,शहर सचिव सचिन गुंजाळ,तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील,सदस...

महाराष्ट्रातील एकूण १५१ लोक अडकले

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  मंत्री महाजन उत्तराखंडमध्ये, राज्य सरकार यात्रेकरूंच्या संपर्कात उत्तराखंडमधील उत्तरकाशीजिल्ह्यातील बराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पुरस्थितीमुळे महाराष्ट्रातील १५१ यात्रेकरू उत्तराखंडमध्ये अडकले आहेत, अशी माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली. यापैकी १२० पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित २१ पर्यटकांशी संपर्क साचण्यासाठी मुख्य सचिव राजेशकुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद चर्चन यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून मदतीची विनंती केली, मोबाईल नेटवर्क आणि बॅटरी चार्जिंग नसल्याने त्यांचा संपर्क होत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमारयांनी राज्य आपत्ती कक्षातून उत्तराखंडमधील यात्रेकरूंवायत आढावा घेतला. बैठकीला मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापनच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, अआपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होते या यात्रेकरुशी संपर्क होत नाही  ठाणे जिल्ह्यातील ५, सोलापूर-४, अहिल्यानगर-१, नाशिक-४,...

सचिन गुंजाळ यांची अ .भा मराठा महासंघाच्या चाळीसगाव शहर सचिव पदी निवड

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  चाळीसगाव( वार्ताहर )अखिल भारतीय मराठा महासंघाच्या चाळीसगाव शहर  सचिव पदी सचिन गुंजाळ यांची निवड करण्यात आली.याबाबत सविस्तर माहिती अशी, सामाजिक व पत्रकार क्षेत्रात आपले नावलौकिक मिळवलेले स्व .पप्पू दादा गुंजाळ यांचे पुतणे सचिन गुंजाळ यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या चाळीसगाव शहर सचिव पदी निवड जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांनी केली तसे नियुक्ती पत्र देखील देण्यात आले.  अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सचिन गुंजाळ यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. या निवडीमुळे सचिन गुंजाळ यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता शिंदे,जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, चाळीसगाव शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील,तालुका उपअध्यक्ष अमोल पाटील,तालुका संघटक शेखर पाटील ,तालुका युवक अध्यक्ष प्रकाश पाटील,युवक संघटक ललित पाटील,पत्रकार सत्यजित पाटील,सामाजिक कार्यकर्ते राहुल...

उत्तर काशीमध्ये ढगफुटी काही लोकांचा मृत्यू काही बेपत्ता हेलिपॅड ही वाहुन गेले

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज दिल्ली: उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये काल दुपारी ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता झाले आहेत. या ढगफुटीचा फटका लष्करालाही बसला आहे.लष्कराच्या हर्षिल येथील तळापासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या धराली गावामध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे तर या बरफुटीमुळे एक हेलिपॅड वाहून गेला आहे. हर्षिलमधील लष्कराच्यात ळालाही या ढगफुटीचा फटका बसला आहे. तसेथ लष्कराचे अनेक जवानही दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत. ढगफुटीमुळे आलेल्या पाणी आणि चिखलाच्या पुरामुळे गंगोत्री धामशी रस्त्यांमार्ग असलेला संपर्क तुटला आहे. ढगफुटीमुळेखीर गंगा नदीला पूर आला. खौर गंगा नदी ही हरी शिला पर्वतावरील सात ताल परिसरातून वाहत येते. तिथेच वगफुटीची ही घटना घडली आहे. या नदीच्या उजव्या भागात धरालीचा परिसर आहे. तर डाव्या बाजूला हर्षिल येथील तेल गाट येथे लष्कराचा तळ आहे. या लष्कराच्या तळालाही ढगफुटीमुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. येथील अनेक जवान बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.हर्षिल येथे लष्कराची १४ राजरिफ यून...

एसटी बस नाल्यात पलटी ५० पेक्षा जास्त जखमी एकाचा मृत्यू

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज जळगाव : एरंडोल-कासोदा मार्गावर शुक्रवारी (दि.1) एकमोठा अपघात घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MH 20 BL 3402) क्रमांकाची एस.टी. बस नाल्यात पलटी झाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू, तर 50 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. एस टी बस एरंडोलवरून भडगावकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात जाऊन पलटी झाली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात येत आहे. एक प्रवासी जागीच ठार झाला असून 15 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तर 35 जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर एरंडोल येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस, आरोग्य विभाग व एस.टी. महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ एरंडोल-कासोदा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.