विषारी कप सिरप मुळे 23 चिमुरड्यांचा मृत्यू कंपनीच्या संचालकाला अटक
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज नवी दिल्ली: श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली. सिरपमध्ये शरीराला अपायकारक घटक मिसळण्यात आले. हे औषध ज्या चिमुरड्यांना देण्यात आले त्यांची तब्येत बिघडल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. तब्येत खालावली आणि मध्य प्रदेशमधील २३ बालकांचा मृत्यू झाला, या प्रकरणाची सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. इथून पुढे कोणत्याही कफ सिरपची प्रत्येक बॅच तयार करण्याआधी त्याची चाचणी घेण्याचे बंधन सरकारने घातले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात कोल्ड्रिंक कफ सिरपची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच औषध विक्रेत्यांना कोल्ड्रिंकचा साठा असल्यास कंपनीकडे परत पाठवून द्या, असे आदेश दिले आहेत. विषारी कफ सिरप प्रकरणी श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे. रंगनाथन गोविंदन हे चेन्नई येथील घर आणि कांचीपुरम येथील कारखान्याला कुलुप लावून पत्नीसोबत फरार झाले होते. मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने दोन दिवस तामिळनाडूतील चेन्नईत ठिकठिकाणी धाडी टाकल्या. पोलिसा...