अ. भा. मराठा महासंघाच्या वतीने युवा उद्योजक राज पुन्शी यांचा वाढदिवस साजरा

 संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 







चाळीसगाव (वार्ताहर) शासकीय विश्रामगृह येथे २ ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता युवा उद्योजक राज पुन्शी यांचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने साजरा करण्यात आला. याबाबत माहिती अशी की,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने युवा उद्योजक राज पुन्शी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने शासकीय विश्रामगृह येथे निवोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज पुन्शी यांना सर्वांनी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तसेच चाळीसगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या देखील शुभेच्छा दिल्यात . तदनंतर शाल श्रीफळ देऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. राज पुन्शी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खुशाल बिडे व अशोक भोसले यांनी आपले मनोगतात सांगितले की, पुन्शी परिवार हा सर्व जातीधर्माच्या सुख, दुःखात नेहमी हजर राहणारा आहे. तसेच गोरगरिब जनतेला संकटकाळीन नेहमी आवश्यक ती मदत देखील करण्याचा नेहमी पुढाकार असतो. त्यामुळे पुन्शी परिवाराचे नेतृत्व आणि दातृत्व विसरता येणार नाही. यावेळी खुशाल बिडे,अशोक भोसले,नंदकिशोर पाटील,सचिन गुंजाळ ,कैलास पाटील,सिद्धांत पाटील,शेखर पाटील, प्रल्हाद बळे,  भैय्या सावंत,दीपक गुंजाळ ,गणेश जाधव ,सतीश हिरे,महाले गुरुजी, संदीप पवार आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी