चाळीसगांव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा २०२५ – स्वच्छता अभियान

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज




आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश सहसंयोजक आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव मध्ये सुरु झालेल्या सेवा पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ शहरात विविध ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबवून करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रतापसिंह चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, महात्मा जोतीबा फुले स्मारक, वीरभाई कोतवाल चौक, संताजी जगनाडे महाराज चौक तसेच बस स्थानक परिसर येथे भारतीय जनता पार्टी चाळीसगाव शहर मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान घेण्यात आले.


🙏 शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.


🚩 पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी दिलेला “एक पाऊल स्वच्छतेकडे” हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हीच खरी त्यांना जन्मदिनाची भेट आहे.


स्वच्छ भारत – स्वस्थ भारत हेच आपले ध्येय!

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी