राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत गुड शेपर्ड अकॅडमीची ओवी पाटील राज्य विजेती

 संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 

चाळीसगाव (वार्ताहर)स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा- 2025 ही चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. दि.10 ते 14 सप्टेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील, चाळीसगाव व श्रद्धा इंगळे, कराड या दोघींनी 13 वर्षा खालील दुहेरी गटात विजय प्राप्त केला. त्यांनी सेमी फायनल मध्ये हेजल जोशी व स्पृहा जोशी मुंबई उपनगर या खेळाडूंना 21-15 व 21-14 ने हरवत अंतिम सामन्यासाठी आपली जागा निश्चित केली.


अंतिम सामन्यामध्ये ओवी आणि श्रद्धा यांच्या जोडीने मायरा गोराडिया व कनक जलानी मुंबई यांचा 21-14 व 21-15 सरळ दोन सेट मध्ये पराभव करत विजय नोंदवला. त्यांना सुवर्णपदक, ट्रॉफी, रोख रक्कम व प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


ओवीला तीचे वडील अमोल पाटील तसेच क्रीडा शिक्षक मनोज गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. 


शाळेचे प्रिंसिपल डॅनिअल दाखले सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ओवीचे कौतुक व अभिनंदन केले. व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी