आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा देवुन यशाचा मार्ग प्रशस्त करावा-मा.उज्वलकुमार चव्हाण
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
चाळीसगाव (वार्ताहर)विशाल युवा फाऊंडेशन तळेगाव यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय तळेगाव येथे शनिवार दिनांक 20/09/2025 रोजी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज व सावीञी माई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दिपप्रज्वलनाने झाली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय उज्ज्वल कुमार चव्हाण (माजी IRS, अॅडव्होकेट, मुंबई उच्च न्यायालय)तर प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाला मा. प्रदीप दादा देशमुख, मा.रवींद्र ठाकरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सिल्लोड), मा.अतुल पाटील (सहाय्यक आयुक्त मत्स व्यवसाय विभाग, जळगाव),कुणाल चव्हाण (सहाय्यक पोलीस निरीक्षक चाळीसगाव ) माजी प्राचार्य एस आर.जाधव ,शाळेचे पर्यवेक्षक एन.व्हि .देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी वरिल सर्वच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त आणि वेळेचे नियोजन यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी स्पर्धा परीक्षा हा फक्त करिअरचा मार्ग नसून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे साधन असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भीती झुगारून स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मकतेने पाहावे व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अभ्यास अधिक परिणामकारक करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय मनोगतात उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी भाषणात योग्य संगतीत राहुन तरुणांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी अखंड मेहनत करण्याचा सल्ला दिला. योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वाससाने स्पर्धा परिक्षा देवुन यशाचा मार्ग प्रशस्त करावा असे सांगुन युवकांनी वाईट गोष्टींपासुन दुर रहान्याचे सांगताना बुध्दांच्या पंचशीलेचा व संत,महापुरुषांनी,वारकर्यांनी सांगितलेला मार्ग आचरण आणावे असे त्यांनी विविध दाखले देऊन स्पष्ट केले.
या सोहळ्यात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी तसेच विविध शासकीय विभागांत नोकरीला लागलेले मुलांचा यथोचित सत्कार भारतीय संविधानाची प्रत व गौरवचिन्ह देऊन करण्यात आला.सदर कार्यक्रम खान्देशी अधिकारी मंडळ,मिशन आयएएस जळगाव ,तळेगाव युवा फाऊंडेशन ,माध्यमिक विद्यालय तळेगाव,तुषार देशमुख,तात्या गोरे,प्रविण पवार प्रा.किरण पाटील यांच्या सौजन्याने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पगारे यांनी केले, सूत्रसंचालन आदिती किरण सानप यांनी, तर आभार प्रदर्शन योगेश गोरे यांनी केले.कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, गावातील युवक, तसेच पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षेच्या इच्छुक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गावातील नागरिक, पालक व शिक्षकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल युवा फाऊंडेशन व तळेगाव युवा फाऊंडेशन च्या सदस्यांनी परिस्ञम घेतले.




Comments
Post a Comment