नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत सोमवारी
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी
मुंबई -राज्याती २४७नगरपालिका आणि १४७नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या ६ ऑक्टोबरला सोमवारी सोडत काढली जाणार आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत काढली जाईल. या आरक्षण सोडतीच्या संदर्भात नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी शुक्रवारी राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. आरक्षण सोडतीसाठी पक्षाच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment