चाळीसगाव नगरपालिकेचा प्रभाग रचनेचा तक्ता जाहीर
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
चाळीसगाव (वार्ताहार) नगरपालिका निवडणुकीसाठी चाळीसगाव शहरातील प्रभाग आरक्षणाचा तक्ता आज दिनांक 8ऑक्टोबर रोजी जाहीर केलेला आहे. एकूण 18 प्रभागासाठी अ आणि ब या गटानुसार पुरुष व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
तक्त्यानुसार
प्रभाग क्रमांक 1 ते 4 जनरल पुरुषांसाठी तर त्यांचे जोड प्रभाग अनुक्रमे जनरल महिला ,ओबीसी महिला आरक्षित करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक 7,8,10,11 ओबीसी पुरुषांसाठी तर त्यांच्या जोड प्रभागात जनरल व ओबीसी महिला यांना आरक्षण देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक 9 एस सी पुरुष तर जोड प्रभाग जनरल महिला यांच्यासाठी राखीव आहे.
प्रभाग क्रमांक 12 ते 18 या गटात बहुसंख्य प्रभाग जनरल पुरुषांसाठी असून जोड प्रभागात एसी महिला ओबीसी महिला आणि जनरल महिला आरक्षित करण्यात आले आहे.
या आरक्षणामुळे शहरातील विविध समाज घटकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Comments
Post a Comment