अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सदस्यांची निवड
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
चाळीसगाव (वार्ताहार) अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांचे मार्गदर्शनाखाली मीटिंग आयोजित करण्यात आली होती यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सदस्यांची निवड करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती वृत्त असे की, दिनांक 14 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाची सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती. सदर मीटिंग मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ चे ध्येय धोरण समजाऊन सांगून मराठा महासंघाच्या सदस्य म्हणून दिलीप पाटील,ललित पाटील,समाधान मोरे,बाळासाहेब निकम ,गौरव पाटील यांची निवड तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केली.व बैठकीत ग्रामीण भागात व शहरात शाखा ओपन करण्या बाबत देखील चर्चा करण्यात आली.सर्व सदस्यांचे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे,चाळीसगाव तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,महिला जिल्हा अध्यक्ष अनिता शिंदे,चाळीसगाव शहर सचिव सचिन गुंजाळ,तालुका युवक अध्यक्ष प्रकाश पाटील,तालुका युवक उपअध्यक्ष रोहित बोरसे,तालुका संघटक कृष्णकांत पाटील आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.














Comments
Post a Comment