लोकनेते स्व. पप्पूदादा गुंजाळ युवा फाऊंडेशन आयोजित मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू उपचार शिबिर संपन्न
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज
*चाळीसगाव( वार्ताहर)खडकी बु!* : येथील जि.प.प्राथमिक शाळेत दिवंगत लोकनेते पप्पूदादा गुंजाळ युवा फाऊंडेशन आयोजित एकदिवसीय मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू उपचार शिबिर यशस्वीपणे पार पडले. या ठिकाणी चष्म्याचा नंबर, मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याचे आजार, तिरळेपणा, डोळ्यांचा कोरडेपणा, पापणीचे आजार अशा अनेक समस्यांवर निदान व उपचार करण्यात आले. आपण डोळ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहोत. डोळ्यावर मोबाईल कॉम्प्युटर, टीव्हीमुळे येणारा ताण वाढला आहे. डोळ्यांच्या असंख्य समस्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही भेडसावत असल्याने या सर्वांचा विचार करुन पप्पूदादा युवा फाऊंडेशने हे शिबिर आयोजित केल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष शुभम मांडोळे यांनी सांगितले. साधारण ३०९ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत १७८ चष्म्याचे अल्पदरात वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी २१ रुग्णांची भिवंडी येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी पप्पूदादा युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शुभम मांडोळे, विजय पांगारे, वसंत आभाळे, गणेश कोल्हे,विनायक पवार,संदीप मांडोळे, सचिन ठुबे,राहुल शिंदे, प्रशांत गुंजाळ, शिवाजी आतकर, नाना तांबे, प्रल्हाद सावंत, सर्जेराव शिंदे, मुश्ताक खाटिक,गणेश पवार, विलास चव्हाण, समाधान जाधव, ईश्वर बीडे, यांनी विशेष मेहनत घेतली.






Comments
Post a Comment