तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतमध्ये गुडशेपर्ड अकॅडमी शाळेचे यश

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 



चाळीसगाव (प्रतिंधिनी)शहरात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत गुड शेफर्ड अकॅडमी, चाळीसगावच्या विद्यार्थ्यांनी अलौकिक यश संपादन केले. त्यात के आर कोतकर जुनिअर कॉलेजच्या इंडोर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलींचा संघ तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाने विजयी झाला व सदर संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. यशस्वी विद्यार्थिनींमध्ये अनविका ज्ञानेश्वर पाखले, अक्षरा राहुल राजपूत, आदिती विवेक चव्हाण, ओवी अमोल पाटील, यज्ञा संजय सोनवणे यांचा समावेश होता.

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी प्राजक्ता मनीषा जाधव हिने प्रथम क्रमांक प्राप्त करत यश संपादन केले. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

जिल्हास्तरीय 14 वर्षांच्या आतील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये गुड शेफर्ड अकॅडमीच्या आसिया समीर शेख या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त करत अलौकिक यश संपादन केले सदर विद्यार्थिनीची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री मनोज गोरे व केतन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री डॅनियल दाखले सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी